परतूर । वार्ताहर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने परतूर येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. परतूर तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यर्त्यानी स्वयंस्ङ्गुर्त प्रतिसाद दिला.
तसेच परतूर तालुक्यातील हातडी येधील बाबुराव झरेकर यांची कन्या शीतल हिचा विवाह परभणी येथील शरद कटारे यांच्याशी करण्याचे नियोजित होते. हातडी येथील समता परिषदचे तालुका अध्यक्ष मधुकर झरेकर यांनी नवरदेव शरद कटारे यांना माहिती दिली असता नवरदेव यांनी आगोदर रक्तदान नंतर लग्न अशी भूमिका घेतली, त्यामुळे सर्व मंडळीने देखील होकार दिला. लग्नाच्या आगोदरचे रक्तदान हे त्याचे 31 व्या वेळा झाले. सकाळी अकरा वाजेच्या वेळेस रक्तदान झाले त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आणि त्यानंतर विवाह संपन्न झाला हे शिबीर यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Leave a comment