जाङ्ग्राबाद । वार्ताहर

गेल्या दोन महिन्यापासून बंद  असलेली बस सेवा  शेवटी 22 मे रोजी सुरू झाली. मात्र जिल्हांतर्गत बससेवा सुरू होवून आज 21 दिवस झाले तरी प्रवाशांकडुन मिळणारा अत्यल्प प्रतिसाद पाहता तोट्याचा हा प्रवास केंव्हापर्यंत सहन करायचा असा प्रश्‍न बस आगारासमोर उभा राहिला आहे. जाङ्गराबाद आगाराने जिल्हांंतर्गत बससेवेसाठी 4 बसेस सुरू केल्या आहेत. यात जाङ्गराबाद- भोकरदन- जालना या मार्गे 2 बसेस प्रत्येकी एका ङ्गेरीसाठी तर जाङ्गराबाद- राजूर- जालना मार्गे प्रत्येकी 2 बसेस चार ङ्गेरयांसाठी धावत आहे. 

दररोज 4 बसेसच्या मिळून सहा ङ्गेरयांचे उत्पन्न केवळ 4 हजार रुपयांच्या आसपास येत असून यासाठी डिझेल चा खर्च जवळपास 10 हजार रुपये जाते. बस ङ्गेर्‍यांच्या मागे आगाराला केवळ डिझेल खर्चात दररोज 6 हजारांचा ङ्गटका सहन करावा लागत आहे. एसटी प्रवासात सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून सध्या केवळ 25 प्रवाशांना नेण्याची मुभा असली तरी कोरोनाच्या भीतीने एका बसमध्ये 8 ते 10 प्रवाशांपेक्षा जास्त प्रवासी येत नसल्याने जिल्हांंतर्गत ही तोट्यातील बससेवा केंव्हा पर्यंत चालू द्यायची असा प्रश्‍न आगार प्रशासनासमोर उभा राहीला आहे. ग्रामीण भागातील अनेक जण लॉकडाऊन काळात दुचाकीच्या प्रवासाला पसंती देत असल्याने प्रवाशांनी बससकडे पाठ ङ्गिरविली असल्याचे बोलले जात आहे. लक्ष्मण लोखंडे, आगार प्रमुख (जाङ्गराबाद) यांनी सांगितले की कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या लालपरीचा प्रवास करण्याची ही जनतेला भीती वाट आहे. जिल्हांतर्गत  बससेवेत सध्या आगारातून 4 बसेसच्या 6 ङ्गेर्‍या सुरू असल्या तरी एका ङ्गेरीची आवक 500 ते 800 रुपयांच्या पुढे जात नसल्याने केवळ प्रवाशांच्या सेवेसाठी आगार हा तोट्यातचा व्यवहार सहन करीत आहे. जाङ्गराबाद आगरातील वाहक व चालक यांची संख्या 175 इतकी असून सद्यस्थितीत दररोज 4 वाहक व 4 चालक याप्रमाणे प्रत्येकाला कर्तव्यावर बोलाविले जात आहे. यापुढे एस.टी.सेवेबाबत प्रशासन यापुढे काय निर्णय घेते. त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.