बीड । वार्ताहर
कोरोनाच्या संकटामध्ये शेतकरी हवालदिल झाला असून आता शेती मशागतीचे कामे करण्यासाठी शेतकर्याजवळ काही शिल्लक राहिले नाही. त्यामुळे खरीप हंगामापुर्वी शेती मशागतीचे सर्व कामे मनरेगामध्ये समाविष्ट करावीत आणि शेतकरी, शेतमजुर यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी अॅड.बाळासाहेब राख यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.
कोरोनाच्या संकटामध्ये गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊन असल्यामुळे शेतकर्यांचा माल घरात बसून आहे. फळे-भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली आहे. कापूस,तुर,उडीद, मुग खरेदी केंद्र सुरू झाले नाही. मोंढा बंद असल्याने आलेला माल विकण्याची सोय नाही. त्यामुळे शेती-मशागतीचे कामे करावीत तरी कशी? असा प्रश्न शेतकर्यांसमोर पडलेला आहे. त्यामुळे शेतातील बांध-बदिस्तीसह इतर मशागतीचे कामे मनरेगा अंतर्गत करून घ्यावी. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतमजुरांना हाताला काम मिळेल अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अॅड.बाळासाहेब राख यांनी पालकमंत्री धनंजय मुंडेंकडे केली आहे.
Leave a comment