नांदूरघाट । वार्ताहर
मुंबईतून परतलेल्या दोघांना गावातील दक्षता कमिटीसह पोलीसांनी सांगूनही नकार दिल्याप्रकरणी संबंधितांविरुध्द केज ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शिरूर घाट येथे शांतिनाथ सांगळे यांच्या घरी मुंबईहून काहीजण आले आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली. नंतर पोलीसांनी घरी भेट देत संबंधितांची चौकशी केली. तेव्हा आमच्याकडे कोणीही मुंबईहून आलेले नाही असे त्यांनी सांगीतले, मात्र घरात एक महिला बाहेरगावाहून आल्याचे पोलीसांच्या लक्षात आले. तिची चौकशी केली असता तिने मी व माझा भाऊ मुंबईहून आलो आहोत असे सांगितले. नंतर पोलिसांनी त्यांना आरोग्य तपासणी करून घ्या अशा सूचना दिल्या मात्र सांगळे कुटुंबीयांनी त्या सूचनेचा विरोध केला. या प्रकरणी पोलीस नाईक अतिश मोराळे यांच्या फिर्यादीवरून सोनिया कारभारी गुट्टे (रा.वसई, मुंबई) व तिचे नातेवाईक शांतिनाथ शाहू सांगळे, वैजनाथ रावसाहेब सांगळे, प्रशांत बाबासाहेब सांगळे, अशोक शांतिनाथ सांगळे, (रा.शिरुरघाट, ता.केज) यांच्याविरुद्ध केज ठाण्यात कलम 188, 269, 270 भांदवीसह कलम. 51 (ब) आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 17 महाराष्ट्र पोलीस अधिनियमाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
Leave a comment