नवी दिल्ली -
नीती आयोगाचा कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दिल्लीतील नीती आयोगाची इमारत सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इमारतीमधील कर्मचारी कोरोनाबाधित असल्याची असल्याची माहिती आज सकाळी ९ वाजता मिळाल्यानंतर नीती आयोग भवन ही इमारत तातडीने दोन दिवसांसाठी सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नीती आयोग भवनाच्या इमारतीतील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सगळ्या निर्देशांचे आम्ही पालन करत आहोत. तातडीने ही इमारत सील करण्यात आली आहे. त्याचबरोबर या इमारतीचे सॅनिटायझेशन देखील करण्यात येत आहे. कोरोनाची ज्या कर्मचाऱ्याला लागण झाली आहे त्याच्या संपर्कात आलेल्यांना होम क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती माहिती नीती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Leave a comment