अमरसिंह पंडित यांचे हस्ते जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्विकारले व्हेंटिलेटर
गेवराई । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा आरोग्य यंत्रणेला जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने तीन व्हेंटिलेटर मशीन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांनी व्हेंटिलेटर स्वीकारले. कोरोना विरुद्धच्या लढ्यात ही भेट अतिशय मोलाची असून इतरांनी सुद्धा अमरसिंह पंडित यांचे प्रमाणे पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. यानंतरही आणखी मदत देण्याची घोषणा अमरसिंह पंडित यांनी यावेळी केली.
आपत्तीच्या प्रसंगात नेहमीच अमरसिंह पंडित आणि शिवछत्र परिवार सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून येतात, महापूर असेल किंवा इतर कोणत्याही संकटात त्यांच्याकडून सदैव मोठी मदत होते. कोरोनाच्या संकटात सुध्दा त्यांनी यापूर्वी पाच हजार गरजू कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. जय भवानी आणि जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिक्षक व इतर कर्मचारी यांनी सामाजिक बांधिलकी जपत अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा आरोग्य विभागाला तीन व्हेंटिलेटर देण्याचा निर्णय घेतला आहे.
तीन व्हेंटिलेटर उपजिल्हा रुग्णालय, गेवराई येथे मंगळवार दि. २८ एप्रिल रोजी सकाळी संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह पंडित व कर्मचारी प्रतिनिधी यांच्या हस्ते जिल्हा आरोग्य यंत्रणेला बहाल करण्यात आले. बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकृष्ण पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश शिंदे यांनी त्याचा स्वीकार केला. यावेळी उपविभागीय अधिकारी टिळेकर, गटविकास अधिकारी बागुल, नायब तहसीलदार जाधवर, मुख्याधिकारी बिघोत यांचेसह अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी व्हेंटिलेटर अतिशय उपयुक्त ठरतात, सद्यस्थितीत त्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे नमूद करून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. थोरात यांनी अमरसिंह पंडित आणि त्यांच्या सर्व संस्था कर्मचाऱ्यांचे आभार मानले. कोरोना नंतर सुद्धा व्हेंटिलेटरचा फायदा याभागातील रुग्णांना होणार असल्याने ग्रामीण भागात तातडीची वैद्यकीय सेवा देण्यासाठी या व्हेंटिलेटरचा फायदा होईल असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, कृषी बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक आतकारे, कुमार ढाकणे, नगरसेवक शाम येवले, संदीप मडके, शाम रुकर संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद गोरकर, मुख्याध्यापक राजेंद्र जगदाळे, काशिनाथ गोगुले यांचेसह पदाधिकारी, अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते
Leave a comment