कायदा हातात घेणार्‍या अधिकार्‍यांवर काय कारवाई करणार?

बीड । वार्ताहर

भाजीपाला विक्रीचा परवाना नसलेल्या काही महिला शेतकरी आपला भाजीपाला शहरातील नगर रोड परिसरातील कॉलनीत विकत बसल्या होत्या, त्यांच्याकडे विक्रीचा परवाना नसल्याचे कारण पुढे करत नगरपालिकेचे सीओ उत्कर्ष गुट्टे यांच्या नेतृत्वाखालील  पथकातील कर्मचार्‍यांनी या महिला शेतकर्‍यांचा भाजीपाला अक्षरक्ष: नाल्यात फेकून देत आपल्यातील असंवेदनशीलपणा दाखवून दिला. वजनकाटेही जप्त केले. सर्वसामान्य जनतेशी कसे वागायचे याची शिकवण या अधिकार्‍यांना द्यावी अशी मागणी होत असून जिल्हाधिकारी साहेब, शेतकर्‍यांचा भाजीपाला पालिकेला नालीत फेकायचा आदेश दिला आहे का? असेही जनतेतून विचारले जात आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात एकदिवसाआठ अडीच तासांसाठी संचारबंदी शिथील केली जाते. या दरम्यान ग्रामीण भागातील शेतकरी आपला मोठ्या कष्टाने पिकवलेला भाजीपाला विक्रीसाठी आणतात, मात्र प्रशासनाने परवाना घेवूनच भाजीपाला विकावा अशी अट घातलेली आहे, पण अनेकांना याची माहिती नाही. सोमवारी सकाळी नगरपालिका कर्मचार्‍यांनी आपल्यातील कर्तव्यशिलता दाखवत थेट परवाना नसताना भाजीपाला घेवून आलेल्या महिलेचा भाजीपाला चक्क नालीत फेकून दिला. डोळ्यादेखत भाजीपाला नालीत फेकल्याने त्या महिलेच्या डोळ्यात आश्रू दाटून आले होते. ती वारंवार विनवनी करत होती, मात्र पालिकेच्या कर्मचार्‍यांनी तिचे काहीच ऐकले नाही अन्‌ भाजीपाला फेकून दिला. वास्तविक हाच भाजीपाला पालिकेला गरजूंपर्यंत पोहचवता आला असता, पण नियमावर बोट ठेवत आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले या थाटात कर्मचारी तिथून निघून गेले. दरम्यान नागरिकांतून या कारवाईचा संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांनी अशा अधिकार्‍यांना किमान संवेदनशिलतेची शिकवण देण्याची गरज आहे. 

भाजीविक्रेत्या शेतकर्‍यांना

त्रास देवू नका- राजेंद्र मस्के

कोरोना जागतिक महामारी आपात परिस्थितीत संपूर्ण देशभरात शासन आणि प्रशासन नियोजनबद्ध पद्धतीने परिस्थिती हाताळत असताना बीड नगरपालिकेचा अजब कारभार शहरांमध्ये चालू आहे. विनाकारण भाजीविक्रेता शेतकर्‍यांना त्रास देण्याचे काम नगरपालिका कर्मचार्‍यांकडून होत आहे. भाजी फेकून देणे भाजी ट्रॅक्टर मध्ये भरून नेणे, त्यांची हेटाळणी करून शेतकर्‍यांचे नुकसान होईल असेच पाऊल या संचार बंदीच्या काळामध्ये चालू आहे. नगरपालिकेच्या या भूमिकेमुळे शेतकरी बांधवांचे आर्थिक नुकसान व कुचंबना होत आहे. नगरपालिका प्रशासनाने हुकुमशाही वृत्तीमध्ये तातडीने बदल करावा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे. 

गुन्हा दाखल झाला तरी मस्ती कायम

बीड नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे हे व्यक्ती म्हणून अतिशय चांगले आहेत. लोकांशी त्यांचा संवाद नेहमीच सकारात्मक असतो, मात्र लॉकडाऊनमध्ये काही दिवसापूर्वीच त्यांची एका मेडिकल दुकानाबरोबर हाणामारी झाली. त्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तरीही त्यांच्यातील अधिकार्‍यांची मस्ती कायम आहे. काल नगर रोडवर भाजीपाला विक्रीसाठी बसलेल्या शेतकर्‍यांना आणि महिलांना परवाना आहे का? अशी विचारणा करत त्यांचा भाजीपाला थेट नालीतच टाकून दिला. हे कुठल्याही संवेदनशिल माणसाला शोभणारे नाही. डॉ.उत्कर्ष गुट्टे हे मुख्याधिकारी म्हणून आल्यापासून शहरातील स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले आहेत. शहरातील सॅनिटरायजेशन नावालाच केले गेले. जिल्हाधिकारी साहेब, जरा या प्रकाराकडे लक्ष द्या. अधिकारी नियम लावायला आहेत हे मान्य आहे. मात्र ते लोकांचे नुकसान करणारे असतील आणि गोरगरिबांना मारहाण करणारे असतील तर त्यांना चौकात उभा केल्याशिवाय पर्याय नाही. नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी देखील या प्रकाराकडे लक्ष द्यावे आणि गुट्टेंच्या जागी दुसरा चांगला मुख्याधिकारी आणावा अशी मागणी शहरातील व्यापारी बांधवांनी केली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.