आष्टी । वार्ताहर
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने पिंपळा ता आष्टी येथील तब्बल तीन आठवड्यापासून बंद असलेली महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा सोमवार पासून सुरू झाली आहे.
आष्टी तालुक्यातील पिंपळा गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता . त्याला उपचारासाठी अहमदनगर येथे पाठवल्यानंतर गाव संपूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले होते.अत्यावश्यक सेवा ही बंद असल्याने गावातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा देखील मंगळवार दि 7 एप्रिल पासून बंद होती . मॅनेजरसह 5 कर्मचारी येथे काम करतात . पिंपळा सह परिसरातील कोयाळ, सोलापूरवाडी सारखी गावे आणि वाड्या वस्त्यावरील लोकांचे बँक खाते या शाखेत आहे. बँक बंद ठेवण्यात आल्याने लोकांना आपल्या खात्यातून पैसे काढणे अशक्य होते. तथापी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.त्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ही रोगमुक्त झाला. त्यामुळे गावातील लॉकडाऊन अंशतः शिथिल करण्यात आले.त्यामुळे शुक्रवार पासून दूध संकलन तर शनिवार पासून किराणा दुकाने सुरू झाली.आता विषम तारखेला बँक शाखा देखील सुरू झाली. सोमवारी सकाळी 7 ते साडेनऊ यावेळेत बँक सुरू राहणार आहे . याची पूर्वतयारी म्हणून रविवारी बँके इमारतीसमोर सोशल डिस्टन्ससाठी मार्किंग करण्यात आले होते. सोमवारी सुरळीतपणे काम झाले असून अनेक ग्राहकांची कामे होत आहेत.
Leave a comment