बीड । वार्ताहर
गोर-गरीबाच्या अडचणीला वारंवार धावून जाण्याचं काम धूत कुटूंबकडून करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात दिवाळीला गोर-गरीब गरजूंना फराळाचे साहित्य वाटप असेल किँवा आज कोरोना सारख्या भयंकर आजारात लॉकडाऊन मुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली असताना धूत कुटुंबातील दिलीप धूत यांचा वारसा पुढे चालवत बीड नगरपालिकेचे नगरसेवक शुभम धूत यांनी पुढाकार घेऊन गोर-गरिबांना अन्नधान्य व किराणा साहित्य किट्स वाटप करण्याचे काम महीनाभरापासुन सुरु केले आहे.
खांडे पारगाव येथे ऊसतोड मंजूर करखान्यावरून आले असता शुभम धूत यांना संपर्क केला असता शुभम धूत हे मजुरांच्या मदतीला धावून आले खांडे पारगाव येथे गावाबाहेर ठेेवण्यात आलेल्या सर्व उसतोडता मजुरांना अन्नधान्य व किराणा साहित्य किट्स वाटप करण्यात आल्या. यावेळी शुभम धूत, राजेंद्र आमटे, सचिन आमटे, शैलेश नाईकवाडे, प्रदीप आमटे, राजू सय्यद, किशोर आमटे, अभिजीत आव्हाड, सागर वाहुळ, पांडुरंग सपकाळ, बंडू सपकाळ, अक्षय ठोकळ आदी उपस्थित होते.
Leave a comment