वीस गावचे प्रस्ताव पेंडीग
आष्टी । वार्ताहर
एकीकडे कोरोना तर दुसरीकडे तीव्र पाणी टंचाई अशी परिस्थिती आष्टी तालुक्यातील अनेक गाव, वाड्या व वस्त्यावर दिसून येत आहे. आष्टी तालुक्यामध्ये गेली चार ते पाच वर्षापासून पर्जन्यमानाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे तालुक्यातील जवळपास सर्वच नद्या कोरडेठाक असून किन्ही, निंबोडी, मेहकरी धरण वगळता इतर धरणाने तळ गाठला आहे.
या वर्षी पाऊस कमी तसेच काही दिवस नगर जिल्ह्यातील मुळा धरणातून पाणी आणले होते. यावर्षी अपुरा पाऊस पडल्यामुळे जमिनीतील पाणी पातळीत वाढ झाली नाही. या वर्षी आष्टी तालुक्यातील बत्तीस गावात पाणी टंचाईच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. त्यापैकी मुर्शदपूर, धानोरा, शेरी बुद्रुक, निमगाव चोभा (वस्ती), जामगाव/देवीगव्हान, शेरी खुर्द, वटणवाडी, पिंपळा/काकडवाडी, लोणी सय्यदमीर, कोयाळ या गावांना मेहकरी, किन्ही व सीना धरणातून अठरा टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तर शेडाळा, ब्रम्हगाव, रूई नालकोल, पारगाव जोगेश्वरी, बिडसांगवी, पांढरी, टाकळसिंग,पिंपळगावघाट, हरेवाडी, डोंगरगण, मराठवाडी, आष्टा (ह.ना.), क-हेवडगाव, मातावळी, वनवेवाडी या गावचे प्रस्ताव लालफितीत अडकले आहेत.
Leave a comment