गेवराई । वार्ताहर
राज्यातील कोरोनाग्रस्तांवर मात करण्यासाठी गेवराई तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने सोमवार रोजी एक लाख रुपायांची मदत करण्यात आली.मुख्यमंत्री सहाय्यता निधी या नावाने या मदतीचा धनादेश साहय्यक निबंधक कार्यालय गेवराई यांच्याकडे देण्यात आला आहे.शिक्षक पतसंस्थेने एक लाख रुपायांची मदत केल्याने शिक्षकांचे गेवराई तालुक्यातून कौतुक केले जात आहे.
सध्या संपूर्ण जग कोरोना मुळे हैराण झाले असुन भारत देशा बरोबरच महाराष्ट्र राज्यातील जनता देखील हैराण झाली आहे.कोरोनावर मात करण्यासाठी राज्यातून आर्थिक मदतीचा सध्या ओग सुरु झाला आहे.यामध्ये गेवराई येथील तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था देखील मदतीला धावून आली आहे.या पतसंस्थेचे चेअरमन तात्यासाहेब मेघारे,व्हा.चेअरमन ताराचंद कवरे व सुरेश सानप आदिच्या उपस्थितीत पतसंस्थेत एक ठराव घेण्यात येऊन कोरोनाग्रस्तांना मदत करण्याचे ठरविण्यात आले.त्या अनुषंगाने सोमवार दि.27 रोजी एक लाख रुपायांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी नावाने येथील साहय्यक निबंधक कार्यालयाकडे देण्यात आला आहे.यावेळी चेअरमन तात्यासाहेब मेघारे,व्हा.चेअरमन ताराचंद कवरे,सचिन सुरेश सानप,संचालक विष्णू खेञे,धनंजय सुलाखे,ज्ञानोबा राठोड,आण्णासाहेब लोणकर,प्रताप कुडके,भगवान फुंदे,भागवत खेडकर,अर्जुन बारगजे,बाळासाहेब दहिफळे,आशा आलगुडे,हौसाबाई बादाडे,दिलीप नरुटे,गोविंद शेळके,बाळू खंडागळे,व्यवस्थापक शामसुंदर कुलकर्णी आदि यावेळी उपस्थित होते.या संस्थेतील सर्व शिक्षकांनी एकञ येऊन कोरोना ग्रस्तांना एक लाख रुपायांची मदत केल्याने गेवराई तालुक्यातून शिक्षकांचे कौतुक केले जात आहे.
Leave a comment