गेवराई । वार्ताहर
कोरोनामुळे लॉकडाऊन होऊन आज तब्बल दीड महिना झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकार हे बोल बच्चनचे काम करत आहेत. मोदींना जाहिर केले ते सुधा अजून जनतेला मिळाले नाही. त्यामध्ये रोजगार हमी चे मजुरांना 2000 हजार बांधकामगारांना 5000 हजार रेशनवर तूरडाळ, तेल, मीठ, फक्त तांदूळ आला शेतकरी यांना जे चालू आहेत तेच दिले त्या व्यतिरिक्त पैसे मिळाले नाहीत. उज्वला गॅस मध्ये खुटी मारून ठेवली. जनधन खात्यात काहींना पैसे आले तर काहींना नाही. त्याच प्रमाणे राज्यसरकार रोजगार हमीचे काम चालू करुत म्हणाले अजून जैसे थे आहे.
कापूस खरेदी 20 एप्रिल पासून सुरू काही ठिकाणी केली त्यामध्ये जिल्हात 5 ते 6 केंद्र सुरू असून रोज फक्त 20 वाहनांना परवानगी त्यात भाव एकदम कमी तूर व हरभरा खरेदी चालू नाही. दुधाचे भाव प्रचंड पडले आहेत अंध अपंगांना जे चालू तेच दिले नवीन काही नाही ज्या गोष्टी लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यात होणे गरजेचे होते. ते दिड महिना झाला तरी नाही तेव्हा आता तरी सरकारने सोशल डिस्टन्स पळून कापूस खरेदी इतर सर्व हमी भाव खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करून जाहीर केलेले सर्व पैसे तात्काळ खात्यावर जमा करावेत व राजसरकारने केंद्र प्रमाणे राज्यात शेतकरी सन्मान निधी या महिन्या पासूनच सुरू करावा. कारण आता जनतेचा अंत पाहू नका कोरोना विरुद्ध लढण्यासाठी सैन्याला रसद लागते हे समजून घ्या असे राज्य व केंद्र सरकार यांना मनसे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Leave a comment