मेडिकल की किराणा दुकान ? ग्राहकांना प्रश्न
गेवराई । वार्ताहर
शहरात आणि ग्रामीण भागातील कार्यरत असलेल्या मेडिकल दुकान एकाच्या नावाने आहेत, मात्र त्यांना चालवणारे अप्रशिक्षित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, मेडिकल दुकान आहेत की, किराणा दुकान? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन बहुतांश दुकानदारांनी उखळ पांढरे केले असल्याची चर्चा आहे. लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन, तालुक्यातील अनेक व्यावसायिक ग्राहकांच्या खिशाला कात्री लावून लुट केली जात असून, सरकारी यंत्रणेचे व्यावसायिकावर नियंत्रण नसल्याने सामान्य माणसाच्या अडचणीत वाढ झाली. दरम्यान, मेडिकल दुकानदारांनी चालवलेल्या मनमानी कारभारामुळे नागरीकांमध्ये नाराजी आहे.
कोरोना सारख्या आजाराला रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली असून, अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यावसायिक सेवा बंद करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेची वेळ ठरविण्यात आली असून, घेण्यासाठी साडे सात ते नऊ तीस पर्यंत नागरिकांची वस्तू खरेदी करण्यासाठी धावाधाव सुरू असते. वेळ कमी असल्याने ग्राहकांनी भावा संदर्भात विचारले तर अरेरावी करून हुज्जत घातली जाते. त्यामुळे ग्राहकांना चुपचाप वस्तू घ्यावी लागते. सरकारी दवाखान्यात मोफत सीझरची व्यवस्था आहे. मात्र, काही वेळा मेडिकल बाहेरून आणावे लागते. त्याचा एकूण खर्च चार हजार रुपये असताना, काही मेडिकल दुकानात जास्तीचे पैसे घेतले जातात. ही बाब लक्षात आल्यानंतर गेवराई उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ राजेश शिंदे यांनी अनेकांची कानउघाडणी केल्याची चर्चा आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांकडून मेडिकल मालक जादा दराने पैसे घेत आहेत. औषधी दुकानदार कोणत्याही ग्राहकांना औषधी दिल्यावर बिलाची पावती देत नाहीत. ज्याच्या नावावर लायसन्स आहे , अशा लायसन्स धारकांनी स्वत:चे लायसन्स दुसर्याला भाडे तत्वावर दिल्याची माहिती मिळाली असून, ही गंभीर बाब आहे. दुकानाच्या नावाची पाटी लावण्यात आलेली नाही. त्यामुळे दाल मे कुछ काला है, अशी चर्चा आहे. परवानगी नसलेल्या वस्तूंची ही विक्री करून, हे मेडिकलवाले उखळ पांढरे करून घेत आहेत. उपजिल्हा रुग्णालय, मोंढा नाका, शास्त्री चौक, मेन रोड परीसरात असलेल्या मेडिकल दुकानात तोबा गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेऊन, बीले न देता औषधी देऊन जादा पैसे उकळले जात असल्याची चर्चा आहे. शहरात आणि ग्रामीण भागातील कार्यरत असलेल्या मेडिकल दुकाना एकाच्या नावाने आहेत, मात्र त्यांना चालवणारे अप्रशिक्षित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, मेडिकल दुकान आहेत की, किराणा दुकान ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महिनाभरा पासून ग्राहकांची लुट केली जात असताना, अन्न व औषध प्रशासनाची यंत्रणा कुठे आहे ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Leave a comment