बीड । वार्ताहर
बीड शहरांमध्ये हॉटेल अन्विता सुरु होऊन पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. हा वर्धापन दिन म्हणजे सिल्वर जुब्ली. त्यावर खर्च न करता सध्या परिस्थिती मध्ये सुरू असलेल्या कोरोना विरुद्ध लढ्यात खारीचा वाटा म्हणून हॉटेलचे मालक वाय जनार्धन राव यांनी पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एकूण दीड लाख रुपयांची मदत सोमवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे धनादेशाद्वारे सुपूर्द केली.
अन्विता हॉटेलचे मालक राव हे मूळचा कर्नाटक राज्यातील आहे. म्हणजे साऊथ इंडियन.वाय.जनार्धनराव हे त्यांचे नाव. जनार्धनराव यांचे मूळ गाव उडपी तालुक्यातील येल्लोर.वडील सर्वोत्तम वासुदेवराव राव आणि आई काशम्मा सर्वोत्तम राव . दोघेही अतिशय मेहनती व स्वाभिमानी त्यांच्या या स्वभावाच्या शिदोरीवर आज वाय . त्याच्या आईचा कष्टाळूपणा व स्वाभिमान तर वडिलांचा मेहनती व दानशूरपणा हे गुण त्यांच्यात आहेत. राव यांनी बीड शहरात आपल्या व्यवसायाची वाटचाल 1976 पासून सुरू केली पुढे 20 मार्च 1994 हॉटेल अन्वीता सुरू केले. जीवनात संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य व कोणत्याही परिस्थितीत हतबल न होता परिस्थितीला शरण न जाता मार्गक्रमण करणे, हा मंत्र राव नेहमी जोपासत आले आहेत. आपली भूतकाळातील परिस्थिती कधीही विसरू नये व भविष्याकडे सजग आणि सकारात्मक दृष्टीने बघत समृद्ध जीवन जगण्याचा प्रयत्न करावा असे वाय.जनार्धनराव यांनी सांगितले.
आई-वडिलांच्या संस्काराची शिदोरी
जनार्धनराव भावंडांमध्ये सर्वांत मोठे. घरच्या गरीब परिस्थितीमुळे शिक्षणासाठी आजोळी म्हणजे कुंजारू,ता.उडपी येथे ठेवण्यात आले. इतर भावंडांचा जन्म मात्र महाराष्ट्रात झाला . 1963-64 साली एसएससीचे शिक्षण कुंजारू येथे पूर्ण केले. घरची परिस्थिती अतिशय बिकट , तरीही आई- वडिलांनी संस्काराची शिदोरी मात्र भरभरून दिली. त्यामुळे सहाय्यता निधी देण्याचे ठरवले अशी प्रतिक्रिया अन्विता हॉटेलचे मालक वाय. जनार्धनराव यांनी दिली.
Leave a comment