बीड । वार्ताहर
महाराष्ट्रातील बीड सह इतर जिल्ह्यातील ऊसतोड मजूर हे कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात लाँकडाउन मुळे अडकून पडले आहेत. या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः लक्षघालून कर्नाटक राज्यात अडकून पडलेल्या ऊसतोड मजूरांना महाराष्ट्रात आणण्याची व्यवस्था प्रशासनामार्फत करावी अशी ऊसतोड मजूरांच्या नातेवाईकांकडून मागणी होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील जव्हार साखर कारखाना व त्या जवळील काही साखर कारखाण्यावरील ऊसतोड मजूर हे कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यात असलेल्याने त्यांना राज्याची सिमापार करुन येण्याची परवानगी कर्नाटक राज्याचे प्रशासन देत नसल्याने हे ऊसतोड कर्नाटक राज्यात अडकून पडले आहेत.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी बोलून महाराष्ट्रातील ऊसतोड मजूरांची कर्नाटक राज्यातून सुटका करण्याची मागणी ऊसतोड मजूरांच्या नातेवाईका कडून होत आहे.
Leave a comment