परळीतील विविध संघटनांचे तहसीलदार यांना निवेदन_
परळी । वार्ताहर
महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे.या पवित्र भूमीत संतांची हत्या होणे दुर्दैवी बाब आहे.पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात चोर समजून तिघांची हत्या करण्यात आली होती.यातील दोघे हे देशाच्या संत परंपरेतील साधू होते तर एक त्यांचा चालक होता.या दुर्दैवी हत्याकांडातील सर्व आरोपींची सीबीआय कडून चौकशी करून मृत्युमुखी पडलेल्या तिन्ही साधूंना न्याय मिळवून द्यावी अशा आशयाचे निवेदन आज अखिल भारतीय वारकरी मंडळ,श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, परिसरातील संत साहित्याचे अभ्यासक,यासह विविध संघटनानी परळी तहसीलदार यांना दिले आहे.
पालघर च्या गडचिंचले गावात हा मॉब लिचिंग चा प्रकार पोलिसांसमोर जाणून बुजून केल्याचा निवेदनकर्त्यांचा दावा आहे.या घटनेत कल्पवृक्षगिरी महाराज(70),सुशीलगिरी महाराज (35) आणि त्यांचे वाहनचालक निलेश तेलगडे (30) या तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.सदरील हल्ल्याची सीबीआय द्वारे सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी जेणेकरून राज्यात अशा घटना करण्याचे धाडस कोणीही करू नये.तसेच त्यांची करण्यात आलेली हत्या ही अत्यंत दुर्दैवी असून मनाला अत्यंत वेदना देणार आहे.या निवेदनावर परिसरातील पाचशेवर नागरिकांच्या सह्या असून हे निवेदन आज परळी तहसीलदार यांना दिले आहे यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात संत साहित्याचे अभ्यासक अॅड.दत्तात्रय महाराज आंधळे,अखिल भारतीय वारकरी मंडळ मराठवाडा विभागीय अध्यक्ष रामेश्वर महाराज कोकाटे,विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख अतुल दुबे, अॅड.राजेश्वर देशमुख, सुशील येळाये यांची उपस्थिती होती.
Leave a comment