केज । वार्ताहर
कापूस उत्पादक शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी केज तालुक्यातील शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भगवानराव केदार यांनी तहसिलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सध्या देशावर कोरोनोचे संकट आल्याने संपूर्ण देश कित्येक दिवसांपासून लॉकडाऊण करण्यात आला असून सर्वच उद्योगधंदे बंद करण्यात आले आहेत. याच पार्श्वभुमीवर बीड जिल्ह्यातील सर्वच शासकीय कापूस खरेदी केंद्र बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले होते त्यानूसार जिल्यातील सर्वच कापूस खरेदी केंद्र बंद होते.
त्यांनतर कापूस उत्पादक शेतकर्यांनी केलेल्या कित्येक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर 21-4-2020 रोजी जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यातील संबंधित यंञणेसोबत बैठक घेऊन कापूस खरेदी केंद्र सुरू करण्या सबंधि सूचना केल्या आहेत. त्यानुसार केज तालुक्यातील 1500 शेतकर्यांनी केज कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाची नोंद केली होती.त्यामुळे येथिल कापूस उत्पादक शेतकर्यांना दिलासा मिळेल असे वाटत असतानाच शासनाकडून केज तालुक्यातील फक्त एकच शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून संबंधित केंद्रावर दररोज वीस शेतकर्यांचा कापूस खरेदी केला जात आहे. त्यामुळे इतर कापूस उत्पादक शेतकर्यांवर मोठ्या प्रमाणात आन्यय होत आसून 1500 शेतकर्यांच्या कापूस खरेदीसाठी तीन महिन्यांची प्रतिक्षा करावी लागत आसून शेतकर्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी केज तालुक्यातील सर्वच शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भगवानराव केदार यांनी तहसिलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Leave a comment