धारुर । वार्ताहर
महारोग कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार व पोलीस प्रशासनाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असुन या रक्तदानात दाम्पंत्यांनी स्वंयस्फुर्तिने सहभाग नोंदवला. किल्ले धारूर पत्रकार व किल्ले धारूर पोलिस स्टेशन च्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन ग्रामिण रुग्णालयात करण्यात आले होते. यावेळी अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.
कोराना या महामारीच्या काळात राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा जानवत आहे आरोग्यमंञी राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केल्यानंतर आवाहनाला प्रतिसाद देत धारूर शहरात पञकार व पोलीस बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. यावेळी धारूर शहरासह ग्रामीण भागातील अनेकांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान केले. कोरोना सारख्या महारोगाने पूर्ण जगावर विळखा घातला असून भारतात सुद्धा या रोगाचा प्रभाव दिसून आला आहे. तसेच महाराष्ट्रात या रोगाचा शिरकाव झाला असून यात मोठ्या प्रमाणात याची लागण झाल्याचे दिसून येत आहे. या काळात रक्त पुरवठा कमी असल्याच्या जाणवत असून याच पार्श्वभूमीवर किल्ले धारूर पत्रकार व पोलीस प्रशासनाच्या वतीने रक्तदान आयोजित करून वेगळी छाप महाराष्ट्र निर्माण केली आहे. यात जवळपास 50 पेक्षा जास्त रक्तदात्यानी दुपारपर्यंत रक्तदान केले आहे. यावेळी बीड रक्त बँके ने रक्त संकलन केले. यावेळी उपस्थित तहसीलदार व्ही.एस. शिडोळकर, नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी, पोलीस निरीक्षक सुरेखा धस वैद्यकीय अधिकारी चेतन आदमाने, डॉ.परवेज शेख,डॉ संजय पूजदेकर पत्रकार अनिल महाजन, सतीश वाकुडे, सय्यद शाकेर, हरिभाऊ मोरे, अतुल शिनगारे,विष्णू रंदवे, सूर्यकांत जगताप रामभाऊ शेळके, दिनेश कापसे, विश्वास शिनगारे सिरसट,सतीश पोतदार,रवी गायसमुद्रे,अतिक मोमिन, इरफान शेख,ईश्वर खामकर,तसेच रक्तपिढी चे अधिकारी सुकाळे प्रशांत, मात्रे बिबीशन, अमोल हावले, दादा कुनकर तसेच जल दूत विजय सर शिनगारे,विश्वानन्द तोष्णीवाल, तसेच सकल मराठा समाज,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना, ,कायाकल्प फाउंडेशन,यूथ क्लब चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a comment