वडवणी । वार्ताहर
संचारबंदी काळात गरजूंना व ज्यांचे हातावर पोट आहे असे समाज घटक यांना मदत व्हावी,दिलासा मिळावा याच विधायक भूमिकेतून लढा दुष्काळाच्या वतीने अॅड राज पाटील यांनी वडवणी तालूक्यात चिंचाळा देवडी राजाहारीचंद्र पिंपरी चिंचोटी पुसरा हिवरगव्हाण आदि ठिकाणी 500 गरजू कुटुंबांना किराणा सामान व मास्क सॅनाट्राईज साहीत्याचे वाटप करण्यात आले आहे .
वडवणी तालुक्यातील तिगावचे माजी सरपंच तथा लढा दुष्काळाचे प्रमुख अॅड राज पाटील व त्यांचे सर्व टिमच्या वतीने वडवणी तालूक्यातील प्रत्येक गावातील गरजू कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप केले. यावेळी गरजूंना गहू,साखर, तुरदाळ,रवा,चहापत्ती आणि अंगाचे साबण या जीवनावश्यक वस्तूंच्या किराणा साहित्य व सॅनाट्राईजर मास्क कीट्सचे वाटप करण्यात आले आहे. अॅड राज पाटील हे सामाजिक कार्यांत सातत्याने पुढाकार घेतात. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात.तिगावचे सरपंच असताना त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासतात केलेली विविध विकासकामे वडवणी तालूका अद्यापही विसरलेले नाहीत.कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना मदत करण्याचे कार्य करून अॅड राज पाटील यांनी नव्या पिढी समोर चांगला आदर्श ठेवला आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात असलेल्या ‘लॉकडाऊन’ मुळे हातावर पोट असलेल्या मजुरी,रोजंदारी करणा-या कामगारांचे हाल होत असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.अशा कुटुंबांना लढा दुष्काळाची टिम व अॅड राज पाटील कुटुंबियांनी मदतीचा हात दिला आहे. लढ दुष्काळाच्या माध्यमातुन यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वञ स्वागत होत आहे.वडवणी तालूक्यात हातावर पोट असणार्या मोलमजुरी करणार्या ज्यात नाभिक, सफाई कामगार,बारा बलुतेदार समाज बांधव,अनुसूचित जाती व जमाती समाज बांधव,घरकाम करणा-या महिला भगिनी व गरजूंना जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप ‘सोशल डिस्टन्स’ पाळून,मास्क बांधून व रितसर यादी तयार करून घरपोहोच करण्यात आले आहे.यावेळी प्रा सत्येप्रेम मगर सर माजी सरपंच आशोक निपटे आरुण मोरे पत्रकार रामेश्वर गोंडे संपुर्ण तढा दुष्काळाची टिम यांचे सहकार्य लाभले.
Leave a comment