नेकनुर/मनोज गव्हाणे
वैद्यकीय सेवा बजावत लोकांना आपलेसे करणारे डॉ.सुधीर राऊत यांचा आज दुपारी घराच्या भिंतीवर बसलेल्या वानरांना खाऊ घालतानाचा व्हिडिओ समोर आला शांत बसून भुकेले वानर तृप्त होत होती.
डॉ. सुधीर राऊत हे नाव वैद्यकीय सेवेमुळे सर्वदूर परिचित आहे. नेकनुरच्या स्त्री रुग्णालयात अधीक्षक असताना रुग्णालयाला दिलेली ओळख कायम नेकनुर करांच्या आठवणीत राहणारी आहे यानंतर बीड येथे जिल्हा रुग्णालयातही आपल्या सेवेतून त्यांनी अनेकांना आपलेसे केले . बीड येथील घराच्या भिंतीवर आलेली वानरे नक्कीच भुकेलेली असावीत हे जाणत राऊत परिवाराने त्यांना खाऊ घातले. डॉ.सुधीर राऊत हे त्यांना आपल्या हाताने खाऊ घालत असताना शांत बसलेली वानरे भुकेने किती व्याकुळ होते याचा प्रत्येय दिसून येतो. अंगात सेवाधर्म असेल तर तो कोणासाठीहि उपयोगात आणता येतो हेच राऊत परिवाराने वारंवार दाखवून दिले आहे.
Leave a comment