बीड । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग एक महिना व्यावसायिकांची दुकाने बंद राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. लग्नसराईच्या काळात दुकान बंद ठेवण्याची वेळ आल्याने व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. 3 मेपर्यंत बंद असून यापुढे शासन काय निर्णय घेते यावर सर्व अवलंबून असेल. सर्वच व्यापारी मोठी उलाढाल करणारे नसून, यातील बहुतेक छोटे व किरकोळ दुकानदार असून त्यांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
लॉकडाऊन काळात कापड व्यावसायिक, हॉटेल, शीतपेय विक्रेते, जनरल स्टोअर्स, झेरॉक्स , लॉटरी, सलून चालक, मोबाईल विक्री व दुरुस्ती, हातगाडीवर खाद्य पदार्थ विकणारे आदी व्यवसाय बंद झाल्याने बाजारपेठेत शुकशुकाट पसरला आहे. नोव्हेंबरपासूनच लग्नसराईला सुरुवात झाली. मार्च ते मे या तीन महिन्यात लग्नाचे मोठे मुहूर्त असतात. याच काळात कापड व्यावसायिकांसह हॉटेल, प्रिंटिंग प्रेस, वाजंत्रीवाले, डीजे चालकांचा व्यवसाय होतो. यंदा लग्नसराई ठप्प झाल्याने त्याच्याशी निगडित अनेक व्यवसाय बंद राहिल्याने महिन्यात करोडोची उलाढाल ठप्प झाली. लॉकडाऊन मुले ग्रामीण भागातील नागरिक तालुक्याच्या ठिकाणी येत नसल्याने दुचाकी व चारचाकी जागेवरच पडून राहिल्या, परिणामी पेट्रोल, डिझेलच्या विक्रीवर मोठा परिणाम दिसून आला. वाहन रस्त्यावर न आल्याने गॅरेज चालकांचे मोठे नुकसान झाले. गॅरेजवर दुरुस्तीचे काम करणारे गरीब घरातील तरुण बेरोजगार झाल्याने त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न बिकट बनला.जामनेरला हातगारीवर कचोरी, समोसा, बटाटा वडा, पाणी पुरी, पाव भाजी, थंड पेय विकणार्यांची संख्या सुमारे तीनशे असावी एक महिन्यापासून त्यांचा व्यवसाय ठप्प झाला असून कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवावा याची चिंता त्यांना सतावत आहे. सुमारे दीडशे सलून दुकाने असून त्यांना उपासमारीचे जीवन जगावे लागत आहे.
Leave a comment