बीड । वार्ताहर
कोरोनाचा प्रादुर्भावर रोखण्यासाठी राज्यामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्वच उद्योग-व्यवसायांसह शैक्षणिक संकुलेही बंद ठेवण्यात आलेले आहे. दिवसेंदिवस परिस्थिती कठीण होत असून लॉकडाऊनही वाढत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. ते टाळण्यासाठी आदित्य महाविद्यालयाने अकरावी व बारावीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनाठी आदित्य कॉलेज ने प विकसीत केले आहे. या अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घर बसल्या शिक्षण उपलब्ध होणार आहे. यात प्रामुख्याने मुंबईच्या झील क्लासेसमधील तज्ज्ञ डॉक्टरेट व आयायटीएन्स यांचे मार्गदर्शन मोफत मिळणार आहे, अशी माहिती आदित्य शिक्षण संस्थेचे संस्थापक सुभाषचंद्र सारडा यांनी दिली आहे.
सध्या कोरोना विरुध्दची लढाई जागतीक पातळीवर सुरू आहे. या लढाईत विजय मिळवण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या घरातच थांबून सुरक्षीत राहणे गरजेचे बनले आहे. तरच कोरोनामुक्त महाराष्ट्र राज्य आणि आपला भारत देश होईल. लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आदित्य कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेणाऱ्या अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना घर बसला तज्ज्ञांचे मार्गदर्शन व शिक्षण मिळवे म्हणून महाविद्यालयाने गुगुल प्ले स्टाेअरवर ॲप विकसीत केले आहे. लाॅकडाऊन संपल्यानंतर महाविद्यालये सुरू हाेतीलच मात्र सध्यस्थितीला आदित्य काॅलेज ॲप शिक्षणासाठी उपयुक्त ठरणार आहे, असेही संस्थापक अध्यक्ष सारडा यांनी कळवले आहे.
महाविद्यायतील इयत्ता अकरावी( दहावीची परीक्षा दिलेल्या) व बारावीच्या विज्ञान शाखेच्या च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत अँड्रॉइड अँप्लिकेशन ( ॲप ) मार्फत शिक्षण देण्यात येत आहे. यात नीट, आयाआयटी IIt, Jee या विषयाचे मुंबई येथील झील कलाससेस चे तज्ञ मार्गदर्शन करत आहे. मागील दोन आठवड्यापासून इयत्ता ११ वि १२ च्या लाईव्ह मार्गदर्शन विद्यार्थ्यांना अँप्लिकेशनवर मिळत आहे. या अँप्लिकेशनवर विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच विविध स्पर्धा परीक्षांचे देखील मार्गदर्शन होत आहे. अँप्लिकेशनमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक धड्यावरील व्हिडिओ तासिका, शॉर्ट नोट्स, दररोज ऑनलाईन परीक्षा, लाईव्ह समस्यांचे निराकरण, लाईव्ह व्हिडिओ तासिका इत्यादी गोष्टी मिळत आहेत. त्यामुळे विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या सर्व इयत्ता अकरावी व बारावीच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनींनी माेबाईलमध्ये ॲप डाऊनलाेड करून माेफत तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवून शैक्षणिक नुकसान न हाेऊ देता गुणवत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवानही संस्थापक सारडा यांनी केले आहे.
------
असे घ्यावे ॲप व अडचणीसाठी संपर्क साधावा
या अँप्लिकेशनमुळे विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना फार उत्कृष्टपणे पक्क्या होतील. या माेफत अँप्लिकेशनचा सर्व विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा. हे अँप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर वर जाऊन ADITYA JR COLLEGE टाईप करून डाउनलोड करावे आणि विद्यार्थी म्हणून साइन अप करावे. काही अडचण आल्यास ७०२०५९६३४७ या क्रमांकावर संपर्क करावा.
सुभाषचंद्र सारडा, संस्थापक अध्यक्ष, आदित्य शिक्षण संस्था
Leave a comment