पाणी योजना ठप्प,एक महिन्यापूर्वी टँकरची मागणी करूनही मंजुरी नाहीआष्टी (प्रतिनिधी) जागतिक पातळीवर कोरोनाचा कहर सुरू आहे़ राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना यंदाचा उन्हाळा आणि त्याची तिव्रता याकडे कुणाचे फारसे लक्ष नाही किंवा कोरोनामुळे या विषयाला महत्व नाही अशी परिस्थिती आहे़. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, दर वर्षाप्रमाणे यंदा देखील सूर्याने आग ओकायला सुरूवात केली आहे़ उन्हाची तिव्रता वाढली आहे़ गेल्या आठवड्यात ३५ अंश सेल्सीयस तापमान होते़ रविवारी ३७ अंश तापमानाची नोंद झाली़ दुपारच्या वेळेला उन्हाचे चटके असह्य होत आहेत़ परंतु हातावर पोट असणाऱ्यांना मात्र घरात देखील उन्हाचे चटके जाणवत आहेत.एकेकाळी आख्या आष्टी शहराला पाणी पुरवठा करून शहराची तहान भागवणाऱ्या बेलगाव तलाव काही वर्षांपासून पाऊसाचे प्रमाण कमी होत असल्याने ठणठनाट पाहायला मिळत आहे.यावर्षी तर एका हंडाभर पाण्यासाठी बेलगाव ग्रामस्थांला वणवण करायची वेळ निर्माण झाली आहे. पाणी पुरवठा योजने मार्फत गावात तलावातून पाणी पुरवठा होणारी योजना आहे .परंतु ही योजना धूळखात पडलेले आहे.नवीन ४२ लक्ष रुपयांची पाणी पुरवठा योजना देखील मंजूर असून तीच घोडं कुठे अडलंय हे कळायला मार्ग नाही.तालुक्यात अनेक ठिकाणी पाण्याचे टॅंकर सुरू झाले आहेत. मात्र, बेलगाव ग्रामपंचायत एक ते दीड महिन्यापासून टँकरचा ठराव दिला असून तो मंजूर नाही.पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी येथील परिस्थितीची पाहणी करून टॅंकर अथवा इतर उपाययोजना तात्काळ कराव्यात.अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.पाण्याचा प्रश्न असा दिवसेंदिवस बिकट आणि गंभीर होत चालला आहे. माणसांबरोबरच जनावरांचेही हाल होत आहेत.अशावेळी प्रशासनाने तात्काळ टँकर चालू करावा.अशी मागणी युवक वर्गातून जोर धरत आहे.गेल्या एक ते दीड महिनाभरापासून लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याच्या कसरतीपायी दुसरे कामही होत नसल्याने रात्रंदिवस पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. |
Leave a comment