परळी । वार्ताहर
परळी तालुक्यातील कौंडगाव येथील एक रहिवासी जयगाव येथे त्याच्या पाहुण्याकडे वास्तव्यात आलेल्या एका संशयीताला अस्वस्थ वाटल्याने अंबाजोगाई येथे विलगीकरन कक्षात भरती करण्यात आल्याची माहिती परळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे यांनी दिली आहे.
पुणे येथे कामाला असलेला हा व्यक्ती विस दिवसापुर्वी परतुर येथे आला होता परतुर येथुन तो पायी परळी तालुक्यातील कौडगाव येथे आला होता.दहा ते पंधरा दिवसापुर्वी जयगाव आपल्या नातेवाईकाकडे आला आणी परत तो कौडगावला गेला परंतु त्याची अचानक प्रकृती खराब झाल्याने त्यांने खाजगी दवाखान्यात उपचार घेतले परंतु परत त्याला अस्वस्थ वाटत असल्याने त्याला रविवारी सायंकाळी अंबाजोगाई येथिल विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले असुन त्याचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. दरम्यान जयगावचे 12 तर कौडगावचे 6 जणांची आरोग्य तपासणी करुन त्यांच्या हाताला शिक्के मारुन क्वारंटाईन करण्यात आले आहे.आरोग्य विभागाने त्या दोन्हीही गावात पुर्णलक्ष केंद्रित केले असुन तेथील नागरिकांनी घराबाहेर पडु नये असे आवाहन परळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे यांनी केले आहे.
Leave a comment