केज । वार्ताहर
तालुक्यातील जानेगाव,बनकरंजा शिवारात शेतात गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर छापा मारून दोनशे लिटर रसायन पोलीसांनी उध्वस्थ केले.कडब्याच्या गंजीजवळ गावठी दारूचे रसायन नष्ट केले.
बॅरल नष्ट करण्यात आले.नवसागर मुद्देमाल जप्त करण्यात आला.गीता उद्धव काळे, शांताबाई पंढरी लांब यांच्यावर दारूबंदी कायदा 65 (ई) नुसार कारवाई करण्यात आली.युसूफवडगाव ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक आनंद झोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बी.एम. शेख, एम.एम. माने, पी.व्ही.वाले,के.आर.म्हेत्रे, एसएम.खनपटे,जयश्री गिरी,लिंगेश्वर चोपणे,आदी पथकाने रविवारी ही कारवाई केली.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment