गेवराई । वार्ताहर
लॉकडाऊन असल्याने कामगारांच्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या गोरगरीब कुटुंबाला मदत करण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते पुढे आले असून युवा कार्यकर्ते बाळासाहेब सानप मित्रमंडळ ग्रूप गेल्या वीस दिवसापासून शहरातील व ग्रामीण भागातील गरीब कुटुंबाला आधार देऊन, जबाबदारी पार पाडत आहेत. अशा कठीण काळात गोरगरिबांची काळजी घेऊन सामाजिक ऋणानुबंध जोपासून काम करणार्या बाळासाहेब सानप मित्रमंडळाच्या कामाचे कौतुक केले जात आहे.
या ग्रुपच्या वतीने गेल्या वीस दिवसापासून अत्यावश्यक किराणा कीटचे वाटप करून आधार दिला जात असून, शनिवारी ता. 25 रोजी शहर व ग्रामीण भागातील साठ कुटुंबाला किराणा कीटचे वाटप केले.कोरोना सारख्या आजाराला रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केल्याने गोरगरीब जनतेचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आसतांना त्यांच्या पोटापाण्याची सोय लागावी म्हणुन सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखाली वीस दिवसापासून शहरातील गरजुंना अन्य धान्य व किराणा किटचे वाटप करत आहेत. या सामाजीक उपक्रमाचे कौतुक होत आहे. गेवराई तालुक्यातील विविध भागात राहणार्या गोरगरिब नागरिकांना अनेक दानशूर व्यक्तींनी अन्नदान करण्याची तयारी सुरू केली असून, या उपक्रमातून वंचित घटकाला मदत मिळत आहे. गरीब वस्तीत जाऊन अन्नधान्य किराणा कीटचे वाटपाचे काम केले जात आहे. सोशल डिस्टंन्सिंग पाळून गरजूंना अत्यावश्यक भाजीपाला ही दिला जातो आहे. पाल टाकून शहरात आलेल्या कामगारांना किराणा वस्तूंचे कीट वाटप करण्यात आले. राज्यावर आर्थिक संकट आले असून हातावर पोट भरण्यासाठी आलेल्या गोरगरीबांचे हाल होत असल्याने गोरगरीबांना अन्य धान्य व किराणा किट वाटप करून, आम्ही आपल्या सोबत आहोत, असा धीर देऊन सामाजिक संदेश दिला आहे.
युवा कार्यकर्ते बाळासाहेब सानप, जेष्ठ व्यपारी दिलीप गंगवाल, राजाभाऊ करांडे, शाहदेव चाळक,बाळासाहेब निकम, सोमनाथ मोटे, ओम कानगुडे ,आनंद शेठ छाजेड,विशाल खंडागळे, यांनी या उपक्रमातून सामाजिक ऋणानुबंध जोपासून इतरांच्या सुखादुखात उभे राहून, अशा कठीण काळात गोरगरिबांची काळजी घेऊन सामाजिक ऋणानुबंध जोपासून काम करणार्या बाळासाहेब सानप मित्रमंडळाच्या कामाचे कौतुक केले जात आहे.
Leave a comment