नेकनूर । वार्ताहर
दोन जिल्ह्याच्या सीमेवर असलेले बोरगावचे चेकपोस्ट चोरटी वाहतूक होऊ नये म्हणून केज पोलिसांनी उभे केले. या चेक पोस्टमुळे बोरगावसह परिसरातील काही गावांना काम असतानाही बाहेर पडणे अडचणीचे बनले कर्मचारी चांगले असतील तर चौकशी नसता अगोदर काठी, बेल्ट चा फटका बसत असल्याने अनेकांनी येथून जाणे टाळले पोलीसदादा काम असणार्यांना काठी दाखवू नका,शेतकर्यांना तर नकोच सध्या तुम्ही मिळवलेल्या सहानुभूतीला हे बाधा निर्माण करणारे ठरू शकते.
बोरगाव येथील नागरिकांना या चेकपोस्टमुळे मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. एकीकडे जिल्हा बंदीची हद्द असल्याने कळंब कडील मार्ग बंद तर दुसरीकडे चेकपोस्टमुळे केजकडील यामुळे कुठलेही काम टाळण्याचा मार्ग येथील माराच्या भीतीने ग्रामस्थांनी निवडला विशेष म्हणजे या चेक पोस्टवरील कर्मचार्यांना मदत ही याच गावातून होत आहे मात्र पर्याय नसल्याने अनेकांना महत्त्वाच्या कामासाठी जवळपास जावेच लागते कर्मचारी चांगले असतील तर अडचण लक्षात घेऊन जाऊन देतात तर काहीजण ऐकून घेन्या अगोदरच काठी चालवतात. असाच वाईट अनुभव पोलिसांना महिनाभरापासून मदत करणार्या शेतकर्याला यावा हे दुर्दैवच. शेतीचे सामान आणण्यासाठी विचारणार्या शेतकर्याला शनिवारी नव्याने येते आलेल्या पोलिसाच्या बेल्टला सामोरे जावे लागले विशेष म्हणजे या शेतकर्यांने चेकपोस्ट सुरू झाल्यापासून येथील कर्मचार्याना पाण्यापासून आवश्यक ती मदत पुरवली मात्र या शेतकर्याला याठिकाणी नव्याने आलेल्या पोलिसाच्या आडमुठ्या भूमिकेचा फटका बसला. नव्याने येऊन चेकपोस्टच्या दूर बसून मदत करणार्या शेतकर्यावर बेल्ट चालवणार्या या पोलिसाबद्दल निषेध आणि संताप व्यक्त होत आहे. यामुळे चेकपोस्ट वरील वरिष्ठांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. पोलीस अधीक्षक यांनी कर्मचार्यांना नागरिकांना विनाकारण मारहाण करण्यापासून रोखणे गरजेचे आहे नसता चांगुलपणाच्या सहानुभूतीला गालबोट लागू शकते.
Leave a comment