अंबाजोगाई । वार्ताहर
सामाजिक समानतेचे पुरस्कर्ते महात्मा बसवेश्वर यांची जयंती रविवार,दि.26 एप्रिल रोजी शहरातील घरा-घरात उत्साहात साजरी करण्यात आली.यानिमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 51 युवकांनी रक्तदान केले.तर आणखी 35 जण टप्प्याटप्प्याने रक्तदान करणार आहेत. एकूण 86 जणांनी रक्तदान करण्याची तयारी दर्शवली आहे.21 गरजू कुटूंबांना घरपोहोच किराणा सामानाचे किट देण्यात येणार आहेत अशी माहिती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद पोखरकर यांनी दिली आहे.
अंबाजोगाई शहरातील श्री शंभुलिंग शिवाचार्य मठात मोजक्या पदाधिकार्यांच्या उपस्थितीत जन्मोत्सवानिमीत्त विधीवत पुजाविधी करण्यात आला.त्यानंतर महात्मा बसवेश्वर चौकातील नामफलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीत रविवारी सकाळी डॉ.सिध्देश्वर बिराजदार,डॉ.विनय नाळपे,विनोद पोखरकर यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीरास प्रारंभ झाला.तोंडाला मास्क बांधून व सामाजिक आंतर ठेऊन तसेच रूग्णालयाने ठरवून दिलेल्या ठराविक वेळेनंतर तालुक्यातील 51 युवकांनी रक्तदान केले.आणखी 35 जणांनी रक्तदान करण्यासाठी नोंदणी केली. महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीच्या वतीने 21 गरजूंच्या घरी जाऊन किराणा सामानाच्या कीट्स देण्यात येणार आहेत.या सामाजिक उपक्रमासाठी महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद पोखरकर, सचिव सूरज आकुसकर,प्रसाद कोठाळे, गणेशमामा काळे, सचिन गौरशेटे,शाम आकुसकर,योगेश मोदी,काशीनाथ तोडकर,अमोल व्यवहारे,योगेश पोखरकर, वैभव पोखरकर,धारेकर,देशमाने,मनोज बरदाळे,विकास आकुसकर,जगदीश ढेले,अक्षय आकुसकर,संजय गिराम, दिपक आकुसकर,धनराज पवार,गणेश रुद्राक्ष,रवींद्र राठोड,प्रशांत जाधव,जैन संघटनेचे निलेश मुथा,जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व महात्मा बसवेश्वर बचतगट यांनी सहकार्य केले.
Leave a comment