केज । वार्ताहर
शहरातील प्रा.डॉ. विश्वनाथराव कराड अध्यापक महाविद्यालयातील बीएड प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी घोषवाक्य व चिञांद्वारा कोरोना बद्दल जनतेत जनजागृती केली. घरीच राहून चित्र घोषवाक्य तयार केले.प्राचार्य डॉ किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी उपक्रम राबवला.
विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन हात स्वच्छ धुऊन घेऊ कोरोना आपण दूर ठेवू,तीन मीटर आंतर कोरोना होईल छूमंतर,घाबरू नका पण जागरूक रहा कोरोना पासून सावध राहा, कोरोनाला घालायचा आला मग सोशल डिस्टंशिंग पाळा असे विविध घोषवाक्य द्वारा जनजागृती केली. सदरील घोषवाक्य विद्यार्थ्यांनी ड्रॉईंगशीट वर लिहून आपल्या परिसरामध्ये जनजागृती केली आहे.घरासमोर हे चित्र लावले गेले. सदरील घोषवाक्य संकलित करून र्उेींळव 19 डश्रेसरप इेेज्ञ या नावाने घोषवाक्य संग्रह पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे . ही पुस्तिका सोशोयल मीडियावर लहानांपासून थोरापर्यंत आवडीने पहात आहेत व विद्यार्थ्यांचे कौतुक करीत आहेत. यासाठी ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन प्राचार्य डॉ.किशोर मोरे उपप्राचार्य विक्रम शिंदे प्रा. प्रसाद महाजन यांनी विद्यार्थ्यांना केले.
Leave a comment