वडवणी । वार्ताहर 

देवडी येथील ग्रामपंचायतच्या वतीने गावातील नागरिकांना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या हस्ते नुकत्याच सॅनेटाझर्सच्या 800 बॉटल्सचे वाटप करण्यात आले.. सोशल डिस्टस्टिंगचे पथ्य पाळत सॅनेटाझर्सच्या बाटल्या वितरित करण्यात आल्या.ग्रामपंचायतच्या या उपक्रमाबद्दल ग़ामस्थांनी आनंद व्यक्त केला..

यावेळी देशमुख यांनी सॅनेटाझर्सचा वापर कसा करायचा याची माहिती दिली. तसेच कोरोना विरोधी लढयात प्रत्येक नागरिकांची भूमिका कशी आणि किती महत्वाची आहे हे उपस्थितांना पटवून दिले. शेतीची कामं तर झालीच पाहिजेत पण ही कामं करताना सोशल डिस्टस्टिंगचे पथ्य पाळले गेले पाहिजे तसेच शेतातून घरी परतल्यानंतर आपले हात साबणाने धुतले पाहिजेत.घरातून बाहेर पडताना तोंडाला रूमाल बांधला पाहिजे असे आवाहन देशमुख यांनी केले..गरज नसेल तेव्हा घरातच बसणे आवश्यक असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले..सरपंच जालिंधर झाटे,उपसरपंच गवरचंद आगे, तलाठी प्रमोद चव्हाण, ग्रामसेवक अविनाश राठोड,शाळेचे मुख्याध्यापक अंभोरे आदि यावेळी उपस्थित होते.नंतर ग़ामपंचायतच्यावतीने घरोघरी बाटल्यांचे वितरण करण्यात आले. बाबासाहेब झाटे, बाळासाहेब काकडे, रंगनाथ सोळंके याकूब आदिंनी कार्यक़म यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.