धारूर । वार्ताहर
धारूर येथील कसबा विभागात असलेले जागृत देवस्थान धारेश्वर मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतील देणगी रक्कम मध्यरात्री पसार करत जवळच्याच तुळजाभवानी मंदिरातील दानपेटी चोरीच्या उद्देशाने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली.
धारेश्वर मंदिर हे पुर्वाश्रमीचे जैन मंदिर आहे. कालांतराने येथे शिवशंकरारी पिंड स्थापन करण्यात आली.याभागात धारेश्वर मंदिराचे अनेक भक्त असुन भक्तांनी येथे एक दानपेटी ठेवलेली आहे. जवळच नवीनच तुळजाभवानी मंदिर आहे. परिसरातील नागरिकांचे जागृत देवस्थान म्हणून मोठ्या भक्तीभावाने धारेश्वर मंदिर व तुळजाभावानी मंदिरात येत असतात. शनिवारी रात्री भुरट्या चोरी करणार्या चोरांनी चोरीच्या उद्देशाने दानपेटीची चोरी केल्याचे दिसुन आले आहे. पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर तपास करून चोरांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी येथील नागरिकानी केली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोविंद बास्टे यांनी भेट देवून सर्व परिस्थितीची पाहणी केली आहे. धारूर ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Leave a comment