मुंबई: -
करोना विरुद्धच्या लढाईत सामूहिक शक्तीचं दर्शन घडवण्यासाठी दिवे व मेणबत्ती जाळण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार व शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी स्वागत केलं आहे. 'देशाला करोनाविरोधात एकत्र आणण्याचा मोदींचा हेतू असावा,' असं रोहित यांनी म्हटलं आहे.
करोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी देशातील जनतेला संबोधित केले. 'करोनाच्या आजाराशी लढा देण्यासाठी आपली सामूहिक शक्ती दाखवणे गरजेचे आहे. त्यासाठी फक्त ९ मिनिटे द्या. येत्या रविवारी, ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी आपल्या घरातील सर्व दिवे बंद करा आणि आपल्या गॅलरीत येऊन किंवा घरात तेलाचे दिवे, मेणबत्ती किवा मोबाइलची फ्लॅशलाइट लावा, असं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे.
मोदींच्या या आवाहनावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. 'दिवे लावायला सांगणं हे पंतप्रधानांचं काम नाही. त्यांनी काहीतरी ठोस पावलं उचलून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केलीय. तसंच, लोकांना मुर्खात काढू नका, असंही काही नेत्यांनी सुनावलं आहे. आमदार रोहित पवार यांनी मात्र मोदींच्या आवाहनाचं स्वागत केलंय. 'दिव्याच्या माध्यमातून देशाला करोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधानांचा हेतू असावा. तसं असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं. अशाच प्रकारे प्रत्येकानं स्वत:च्या सोशल मीडिया अकाऊंटवरही राष्ट्रध्वजाचा डीपी ठेऊन एकतेचा हाच संदेश अधिक घट्ट करावा, असं आवाहनही पवार यांनी केलंय.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.