१ कोटी २५ लाख रूपयांची भाजीपाला,फळ विक्री
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचनेनुसार राबवला जि़ल्ह्यात अभिनव उपक्रम
बीड । वार्ताहर
लॉकडाऊनच्या काळात भाजी मंडई मध्ये गर्दी होऊ नये तसेच शेतकऱ्यांना सुरक्षित पणे आपला भाजीपाला विकता यावा, यादृष्टीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचनेनुसार कृषी विभागाने शेतक-यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचा उपक्रम सुरु केला आहे.यामध्ये आतापर्यंत १ कोटी २५ लाख रुपयांची भाजीपाला,फळ विक्री झाली असून याद्वारे शेतक-यांना मोठे सहाय्य मिळत आहे. तसेच जनतेला ही घरबसल्या योग्य दरात ताजा भाजीपाला मिळत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
शेतकरी तसेच शेतकरी गटामार्फत शहरात मोठ्या वसाहतींना व गाव पाड्यात फळे, भाजीपाला विक्रीचा उपक्रम १३ एप्रिल पासून जिल्ह्यात राबवला जात आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचनेनुसार यासाठी तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून फळे व भाजीपाल्याचे दर निश्चित करणे शेतकरी गटांच्या वाहनांना व विक्रेत्यांना परवाना देणे याबाबत कार्यवाही करण्यात आली याचबरोबर त्यांच्या अडचणी सोडवणे व तक्रारीचे निवारण करणे हेदेखील या समितीने पार पाडले त्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचे नियंत्रण आहे. या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत 5 हजार 491 क्विंटल फळे व भाजीपाल्याची ही विक्री झाली आहे व शेतकरी गटांना विना मध्यस्त ही रक्कम प्राप्त झाली आहे,अशी माहिती राजेंद्र निकम जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी बीड यांनी दिली आहे.
शेतक-यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत या उपक्रमातून शेतकरी , शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्यामार्फत ग्राहकांना थेट त्यांच्या दारात भाजीपाला व फळे पुरवली जात आहे. तसेच या उपक्रमात अनेक शेतकरी रोज नव्याने सहभागी होत आहे. गर्दी होऊ नये व फळे भाजीपाला घरपोच मिळावा हे या योजनेचे उद्दिष्ट आहे . त्या दृष्टिकोनातून काटेकोर नियोजन केले जात असल्याचे श्री.निकम यांनी सांगितले.
या उपक्रमात शेतकरी गट यांच्यासह शेतकरी, शेतकरी गट व शेती उत्पादक कंपन्यांनी सहभाग घेतला आहे . त्यांच्यामार्फत शहरातील विविध वसाहतींमध्ये फळ, भाजीपाला विक्री केल्या जातो आहे. शहरी भागासह अन्य भागातही तालुकास्तरावर या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे . कोरोना संसर्गापासून सरंक्षण करण्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी माल विक्री करताना तसेच तालुक्यातून गावात येत असताना काय दक्षता घ्यावी ,यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. यामध्ये सहभागी शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सदस्यांना सुरक्षा किटचे वाटप कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे.
तालुकानिहाय शेतकरी गट संख्या, विक्री झालेला शेतमाल क्विंटल मध्ये आणि विक्री झालेलया शेतमालची रक्कम हजार रुपयांमध्ये पुढील प्रमाणे आहे. बीडतालुका 174 शेतकरी गट संख्येचा विक्री झालेला शेतमाल 1767 .42 क्विंटल असून विक्री झालेलया शेतमालची रक्कम 38 लक्ष 56 हजार रुपये आहे.
पाटोदा तालुका 29 शेतकरी गट संख्येचा विक्री झालेला शेतमाल 365.96 क्विंटल असून विक्री झालेलया शेतमालची रक्कम 1 लक्ष 59 हजार रुपये आहे.
आष्टी तालुका 26 शेतकरी गट संख्येचा विक्री झालेला शेतमाल 288.94क्विंटल असून विक्री झालेलया शेतमालची रक्कम 7 लक्ष 69हजार रुपये आहे.
शिरूर तालुका 42 शेतकरी गट संख्येचा विक्री झालेला शेतमाल 280.90 क्विंटल असून विक्री झालेलया शेतमालची रक्कम 6लक्ष 16 हजार रुपये आहे.
माजलगाव तालुका 30 शेतकरी गट संख्येचा विक्री झालेला शेतमाल 235 क्विंटल असून विक्री झालेलया शेतमालची रक्कम 5 लक्ष 01 हजार रुपये आहे.
गेवराई तालुका 56 शेतकरी गट संख्येचा विक्री झालेला शेतमाल 502. क्विंटल असून विक्री झालेलया शेतमालची रक्कम 13 लक्ष 54हजार रुपये आहे.
धारूर तालुका 46 शेतकरी गट संख्येचा विक्री झालेला शेतमाल 125.94क्विंटल असून विक्री झालेलया शेतमालची रक्कम 3लक्ष 07 हजार रुपये आहे.
वडवणी तालुका 10 शेतकरी गट संख्येचा विक्री झालेला शेतमाल 47.600क्विंटल असून विक्री झालेलया शेतमालची रक्कम 75 हजार रुपये आहे.
अंबाजोगाई तालुका92 शेतकरी गट संख्येचा विक्री झालेला शेतमाल 1176क्विंटल असून विक्री झालेलया शेतमालची रक्कम 30 लक्ष 31हजार रुपये आहे.
केज तालुका 37शेतकरी गट संख्येचा विक्री झालेला शेतमाल 121 क्विंटल असून विक्री झालेलया शेतमालची रक्कम 2लक्ष 37 हजार रुपये आहे.
परळी तालुका 18 शेतकरी गट संख्येचा विक्री झालेला शेतमाल 573.68 क्विंटल असून विक्री झालेलया शेतमालची रक्कम 16 लक्ष 84 हजार रुपये आहे.
जिल्ह्यातील एकूण 560 शेतकरी गट संख्येचा विक्री झालेला शेतमाल 5491.69 क्विंटल असून विक्री झालेलया शेतमालची रक्कम 1 कोटी 25 लक्ष 93 हजार रुपये आहे.
Leave a comment