बीड
-केसरी शिधापत्रिकाधारकांची जी यादी तहसील कार्यालयात नोंदविली आहे आणि ज्यांना सध्या अंत्योदया योजना, प्राधान्य कुटुंब योजना व एपीएल शेतकरी योजना या योजनेखाली धान्य मिळत नाही. अशा सर्व केशरी शिधापत्रिका धारकांना मे व जून 2020 या महिन्यामध्ये हे धान्य मिळणार आहे असे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील यांनी सांगितले आहे परंतु ज्या केसरी शिधापत्रिकेची नोंद तहसील कार्यालयात डिजिटल 1 रजिस्टरला नसेल अशा कार्डधारकांना धान्य मिळणार नाही. यासाठी सर्व दुकानांमध्ये या रजिस्टरच्या प्रमाणित प्रती तहसीलदार च्या स्वाक्षरीने ठेवण्यात येत आहेत.
1.एपीएलAPL केशरी शिधा पत्रिका धारक लाभार्थी माझ्या योजना प्रती लाभार्थी 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ रुपये गहू 8, व तांदूळ रुपये 12 प्रतिकिलो 2.एपीएल APLकेसरी शेतकरी योजना प्रति लाभार्थी 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ , गहू रुपये 2 व तांदूळ रुपये 3 प्रतिकिलो वरील प्रमाणे तालुकानिहाय बीड जिल्ह्यातील पात्र लाभार्थींना सदर योजनेचे धान्य वाटप करताना शासनाचे निर्देशानुसार APL केशरी शिधापत्रिका धारकांना गहू रुपये 8 /- प्रतिकिलो व तांदूळ रुपये 12 /- प्रतिकिलो या दराने मे रास्त भाव दुकानदार मे व जून 2020 साठीचे धान्य प्रतिव्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ याप्रमाणे एकूण 5 किलोप्रमाणे धान्य प्रत्येक लाभार्थी निहाय केशरी कार्डवर वितरण करण्यात येणार आहे सदर धान्य स्वीकारणारे लाभार्थी यांची रेशन दुकानदार यांचे मार्फत ezee forms App द्वारे नोंद केली जाणार आहे त्यामुळे धान्य वितरणात पारदर्शकता येणार आहे. ह्यामध्ये लाभार्थी यांचा फोटो. शिधा पत्रिके च्या पहिल्या पानाचा फोटो व शिधापत्रिकेवरील धान्य वाटपाच्या नोंदीचा फोटो घेणे रास्त भाव दुकानदारांना बंधनकारक राहणार आहे. सदर App वरील सर्व माहिती ही मा. जिल्हाधिकारी,, जिल्हा पुरवठा अधिकारी, सहा. पुरवठा अधिकारी, तहसीलदार यांचेकडून online तपासण्यात येणार आहे. तसेच सर्व नागरिकांना ही सदर माहिती तात्काळ ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सदर धान्य वितरणात पारदर्शकता येणार आहे. ज्या कुटुंबाकडे केशरी कार्ड आहे परंतु त्याची नोंद D1 रजिस्टर मध्ये नाही. त्याची स्वतंत्र नोंद लहान नोंदवहीमध्ये दुकानदारांनी ठेवायची आहे. त्यांना इतर पद्धतीने धान्य कसे देता येईल याचा प्रयत्न करण्यात येईल.
Leave a comment