भारतात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या जशी वाढत आहे तसाच चाचण्यांचा वेग देखील वाढवण्यात आला आहे. मागच्या २४ तासात देशभरात करोना व्हायरसची लागण झाल्याची शक्यता असलेल्यांच्या एकूण आठ हजार चाचण्या करण्यात आल्या. एकादिवसात केलेल्या या सर्वाधिक चाचण्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत शुक्रवारी ही माहिती दिली.
भारतात आतापर्यंत २३०१ जणांचा करोना व्हायरसची लागण झाली आहेत. त्यात ५६ जणांचा मृत्यू झाला तर १५६ जण पूर्णपणे बरे झाले. महाराष्ट्रात आणि तामिळनाडू या दोन राज्यात करोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात ४२३ तर तामिळनाडूत ३०९ रुग्ण आहेत.
आज लॉकडाउनचा १० वा दिवस असून १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे. मागच्या दोन दिवसात तबलिगी जमातशी संबंधित ६४७ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. १४ राज्यांमध्ये तबलिगी जमातशी संबंधित करोनाग्रस्त आढळले आहेत. आतापर्यंत ६६ हजार नागरिकांच्या करोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशातील १८२ लॅबमध्ये करोनाच्या चाचण्यास सुरु आहेत. त्यात १३० सरकारी प्रयोगशाळा आहेत.
Leave a comment