*
केज । वार्ताहर
कोरोना विश्वव्यापी संकटाने भारत देश व महाराष्ट्र व्यापला असताना लॉक डाऊन-एक व लॉकडाऊन-दोन या काळात केज शहर व तालुक्यातील कांही गरजू लोकांची परिस्थिती अत्यंत नाजूक व संवेदनशील बनली होती. केज शहरात कांही सामाजिक संस्था व संघटनांनी अशा गरजेच्या वेळी अत्यंत गरजू लोकांना मदतीचा हात दिला. यामध्ये केज पिटीए (खाजगी क्लासेस संघटनेने) मोठे योगदान दिले. संघटनेच्या वतीने केज शहर व परिसरातील 200 पेक्षा अधिक हातावर पोट असलेल्या गरजू नागरिकांना गहू अट्टा, तांदूळ, तेल, डाळी, साखर,व साबन इत्यादी अत्यावश्यक साहित्याचे किट वाटप करण्यात आले.केज क्लासेस संघटनेचे विजय देशमुख सर यांनी गरजूंना मदत करण्यासाठी मांडलेल्या या प्रस्तावास उत्तरेश्वर चंद्रभान जाधव सर, (गुरुकृपा क्लासेस) यांनी पाठपुरावा करून सुंदर उपक्रमात बदलले. आजपर्यंत केज च्या खाजगी क्लासेस संघटनेने सामाजिक क्षेत्रात पाऊल टाकले नव्हते . मात्र या उपक्रमाने केज येथील खाजगी क्लासेस संचालकांना सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी व मोठी प्रेरणा मिळाली आहे. दोनशेहून अधिक कुटुंबात ही मदत पोहोंच करताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व समाधान पाहता आला. सर्वच सदस्यांनी आर्थिक योगदानाबरोबरच मदत वाटप करण्यासाठी पुरेसा वेळ देऊन परिश्रम घेतले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा हनुमंत भोसले, प्रा श्रीराम सारूक, प्रा विक्रम गालफाडे, प्रा संतोष राऊत, प्रा डॉ विठ्ठल आवाड, प्रा अविनाश घुले, प्रा अनिल रोडे, प्रा चंद्रकांत डांगे, प्रा भैरट, प्रा. अंडील धनराज ,प्रा बाबा शिंदे सर, प्रा अविनाश घुले, प्रा. भगवान जाधव,प्रा. कलढोणे ज्ञानेश, प्रा. विकास मुंडे, प्रा. हर्षद पारखे, प्रा प्रकाश जाधव, प्रा सावंत, प्रा उत्तरेश्वर नवनाथ जाधव, प्रा. अमोल कापसे, प्रा. इंगळे मॅडम,प्रा. लामतुरे मॅडम या सर्वांनी मोठे सहकार्य केले. केज खाजगी क्लासेस संघटनेच्या या स्तुत्य सामाजिक उपक्रमाबद्दल केजवासीय आणि पिटीए चे राज्य अध्यक्ष प्रा आर बी जाधव सर, राज्य कार्याध्यक्ष प्रा विजय पवार सर, मराठवाडा विभागीय अध्यक्ष हनुमंत भोसले सर व बीड जिल्हाध्यक्ष प्रा श्रीराम चौभारे सर यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
Leave a comment