12 हजारांचा मुद्देमाल जप्त: गुन्हे शाखेची कारवाई
बीड । वार्ताहर
लॉकडाऊनमध्ये अवैध दारुविक्री करणार्यांविरुध्द गुन्हे शाखेने मोहीम उघडली आहे. शुक्रवारी मध्यरात्री पाटोदा व आष्टी ठाणे हद्दीत अवैध दारु विक्री करताना दोघांना रंगेहाथ पकडले. यावेळी 12 हजारांचा मुद्देममाल जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक आनंद कांगुणे यांना पाटोदा ठाणे हद्दीतील बोडखेवाडी येथील एका हॉटेलवार छापा टाकला. यावेळी गणेश शहाजी गुंजाळ (34, रा. चौसाळा ता. बीड) हा दारु विक्री करताना आढळला. त्याच्याकडून दारुसह रक्कम असा 8 हजार 55 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. दुसरी कारवाई उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले यांनी आष्टी ठाणे हद्दीत केली. कडा- चोभा निमगाव रस्त्यावर कुक्कुटपालनाशेजारी दारु विक्री सुरु असल्याची माहिती मिळाल्यावरुन छापा टाकला. यावेळी कल्याण कचरु चौधरी (33, रा. टाकळी अमिया) हा दारु विकताना आढळला. त्याच्याकडून 13 हजार 352 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. निरीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाई करण्यात आल्या.
वाळूचे ट्रॅक्टर जप्त
सहायक निरीक्षक आनंद कांगुणे यांनी शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता आगरनांदूर येथून बीडकडे निघालेला अवैध वाळूचा ट्रक (क्र.एमएच 21 बीएफ-7998) पकडला. चालक अशोक सीताराम साठे (23, रा. आगर नांदूर) यास ताब्यात घेतले. वाळूसह ट्रॅक्टर असा एकूण पाच लाख 4 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
Leave a comment