गेवराई । वार्ताहर
कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर देशभरासह राज्यात संचारबंदी कायदा लागू करण्यात आलेला आहे. या दरम्यान दारुविक्री करण्यास बंदी आहे. गेवराई शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध मार्गाने दुप्पट, तिप्पट भाव वाढवुन दारूविक्री केली जात असुन 24 मार्च नंतर गेवराई पोलिसांनी 15 गुन्हे दाखल केले आहेत. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग झोपेचे सोंग घेत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाला या साथ रोगाला रोखण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. सार्वजानिक ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार बंद ठेवण्याचे सक्त आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहे. स्थानिक पातळीवर महसुल, पोलिस, डॉक्टर कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना करीत आहे. लॉकडाऊनच्या काळात दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असतांना देखील शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैध मार्गाने बेभाव दारूविक्री केली जात आहे. गेवराईचे पोलिस निरिक्षक पुरुषोतम चौबे यांनी कडक कार्यवाही करत 15 गुन्हे दाखल करत मोठ्या प्रमाणात दारु नष्ट केली आहे.दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारु विक्री कढे दुर्लक्ष केले आहे. अवैध मार्गाने दारु विक्री करुन लॉक डाऊन दरम्यान बनावट दारु विकुन नागरिकांच्या जिवाशी खेळणार्यावर कार्यवाही होणार का? असा सवाल उपस्थित केला आहे.
Leave a comment