आष्टी । वार्ताहर
कोरोनामुळे आगामी काळात लॉकडाऊन हटल्यानंतर काही प्रश्न उद्भवणार आहेत. त्यामुळे मनरेगाच्या माध्यमातून मागील काळात जसे कामाच्या बदल्यात धान्य दिले जायचे त्या पद्धतीने आता विचार होणे गरजेचे असून कामे वर्क फार फुड ही योजना म्हणजे जो जितके काम करील त्याला तितके धान्य दिले जाईल अशी ही योजना असून याबाबत तात्काळ निर्णय घेण्याची विनंती आ.सुरेश धस यांनी केली आहे.
आ.धस यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात मदत करणारांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती माञ दुसर्या टप्प्यात ती काहीशी कमी झाल्याचे चिञ दिसून आले आहे.त्यातच लॉकडाऊनमध्ये नागरिकांची क्रियाशक्ती कमी होते की काय? ही एक भिती आहे.केंद्र सरकारने मनरेगा अंतर्गत होणार्या कामाचे काही निकष बदलणे गरजेचे आहे.ज्यामध्ये मजूरांना मोबदला म्हणून धान्य देण्याची योजना राबवावी जेणेकरुन ज्या हातांना आजघडीला काम नाही त्यांना काम मिळेल.आणि काही प्रमाणात आगामी काळात येणार्या बेरोजगारीला रोखण्यास याची प्राधान्याने मदत होईल असे आ.धस म्हणाले.टँकर मंजूरीच्या बाबतीत लालफितीत हे प्रश्न अडकून ठेवले जात आहेत.त्यामुळे विनाकारण नागरिकांना दुष्काळाचा सामना करण्याची वेळ प्रशासनाने आणू नये.जे प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविलेले आहेत त्यांना तात्काळ मंजूरी देणे गरजेचे असल्याचे मत आ.सुरेश धस यांनी व्यक्त केले.
पालघर प्रकरणी आरोपींना फाशी द्या
पालघर प्रकरणी ज्या पद्धतीने साधू संतांची हत्या केली गेली आहे.ती अतिशय मन सुन्न करणारी घटना असून सरकारने एकमेकांची उनीधुनी काढण्यापेक्षा यातील आरोपींना फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे असेही आ.सुरेश धस म्हणाले.
Leave a comment