35 दिवसापासून सुरु असलेला भंडारा पुढेही चालणार
बीड । वार्ताहर
कोरोनामूळे देशभरात लॉक डाऊन झाल्यामूळे बीड जिल्ह्यातही बाहेरील अनेक लोक बीडमध्ये अडकून पडले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी संतोष सोहनी यांनी मदतीला धावत आपल्या एमआएडीसी भागातील वैष्णव पैलेस मंगल कार्यालयात थेट अन्नदानाचा महायज्ञच सुरु केला. नास्टा दोन वेळचे जेवन टरबुज खरबुज मोसंबी फरसाण आणी केळी सुधा देण्यात येत आहेत. असा गेल्या पस्तीस दिवसापासून सुरु असलेल्या या भंडार्याला त्यांचा मित्र परिवार आणी व्यापारी बांधवानची मोलाची साथ मिळत आहे. गोरगरिबांची आडचण लक्षात घेता अविरत पणे सुरु असलेल हा भंडारा आता पुढेही काही दिवस सुरु राहणार आहे. सध्या सोहनी यांच्या कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. आम्हाला घरच्यापेक्षा उत्तम सोय झाली ही मानुसकी आम्ही कधी विसरणार नाहीत अश्या प्रतीक्रीया लोकांनी वेक्त केल्या. विशेष म्हणजे परजिल्यातील अडकलेल्या ऊसतोड कामगार आणी मजूरांनच्या 128 मुलाना नवीन कपडेही दिले. कपडे मिळताच त्यांच्या चेहर्यावर आनंद होता. संतोष सोहनी यांच्या या महान कार्यामूळे बीडकरांच्या माणुसकीचे या लोकान खर्या अर्थाने दर्शनच घड्त आहे. सैनीकी शाळा फूड, टेक्नोलॉजी, कॉलेज पाली, जिल्हा परिषद शाळा, पॉलटेकणिक कॉलेज, मूकबधिर विध्यालय, येथे थांबलेल्या लोकांनपर्यन्त दररोज जेवन पोहच केले जातेय.
यांची मोलाची साथ
अन्नदानाच्या भंडार्यात मला अनेकांची साथ मिळत आहे. त्यामूळे मी हा कार्य करु शकलो असे सोहनी सांगतात. बीड शहर व्यापारी महासंघ अध्यक्ष विनोद पिंगळे, जैन समाज माहेश्वरी समाज राज्यस्थानी समाज, सुरेश कुटे, अर्चना कुटे, कुटे ग्रुप, पोलिस प्रशासन, तहसीलदार किरन आंबेकर, मोंढ्यातील सर्व व्यापारी, अन्न व औषध प्रशासन यांची मोलाची साथ मिळत आहे.
Leave a comment