नेकनूर । वार्ताहर
लॉकडाऊन, संचारबंदी असताना केज तालुक्यातील बोरगाव बु .येथे पाझर तलावाच्या कामात अभियंत्याच्या संगनमताने गुत्तेदाराने मोठा भ्रष्टाचार करीत निकृष्ट दर्जाचे काम केल्याने ग्रामस्थांनी चौकशीची मागणी केली आहे.
जिल्हा परिषदकडून गावाच्या वरच्या बाजूला असलेल्या पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी मोठा निधी देण्यात आला. सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने या कामाकडे कोणाचे लक्ष जाणार नाही म्हणून गुत्तेदाराने काम उरकत दर्जाहीन काम केले. भरावासाठी काळी माती न वापरता तेथीलच मुरूम उकरून टाकला. पिचींगसाठी निष्कृष्ट दर्जाचे खरपण वापरण्यात आले.उंचीतही मोठी गडबड केली.यामुळे मोठा निधी खर्च होऊनही या तलावाची गळती कायम राहण्याची शक्यता आहे.यामुळे लाखो रुपये रुपये दुरुस्तीच्या नावाखाली पाण्यातले शिवाय मजुरांच्या हाताला कामही मिळाले नाही.या बोगस कामाची चौकशी करून हे काम दर्जेदार करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जिल्हाधिकार्यांनी याकडे लक्ष देत कामाचा दर्जा तपासावा अशी मागणी होत आहे.
Leave a comment