अंबाजोगाईत शिक्षकांची सामाजिक बांधिलकी
अंबाजोगाई । वार्ताहर
तालुक्यातील अत्यंत हलाखीची परिस्थिती असणारे दैनंदिन मजुरीवर तसेच स्थलांतर करून पोट भरणारे असे जे काही गोरगरीब कुटुंब आहेत.ज्यांना मदत करता येईल अशा 115 गोरगरीब कुटुंबांना त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी एक शिक्षक म्हणून,एक समाजाचा मार्गदर्शक म्हणून आपली नैतिक जबाबदारी समजून अंबाजोगाईतील शिक्षक बांधवांच्या वतीने 115 धान्य किटचे वाटप करण्यात आले.
येथील पंचायत समितीच्या सभापती सौ.विजयमालाताई जगताप,उपसभापती श्रीमती पटेल व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप घोणसीकर, गटशिक्षणाधिकारी रंगनाथ राऊत तसेच तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना यांच्या संकल्पनेतून सध्या संपूर्ण जगासह भारत देशामध्ये कोरोना (कोविड 19) विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन परिस्थिती असल्यामुळे अंबाजोगाई तालुक्यातील अत्यंत हलाखीची परिस्थिती असणारे,दैनंदिन मजुरीवर पोट भरणारे तसेच स्थलांतर करून पोट भरणारे जे गोरगरीब कुटुंब आहेत अशा गोरगरीब कुटुंबांना त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी एक शिक्षक म्हणून,एक समाजाचा मार्गदर्शक म्हणून आपली नैतिक जबाबदारी समजून मदत करण्याची संकल्पना पुढे आली.यामध्ये गरीब कुटुंबांना 5 किलो गव्हाचे पीठ 3 किलो तांदूळ 2 किलो साखर 2 प्रकारच्या डाळी,तेल पुडा,चहापत्ती अशा स्वरूपाचे एक धान्यांचे किट वाटप करण्याचे ठरले होते. त्यानुसार वरील अवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तालुक्यातील शिक्षक बंधू-भगिनींनी आर्थिक मदत निधीचे संकलन करून 115 धान्याचे किट तयार केले.ते गरजवंत गोरगरीब जनतेस वाटप करण्यात आले.यासाठी गटशिक्षणाधिकारी रंगनाथ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेसाहेब सोमवंशी,शिक्षक-मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार,तालुका क्रीडा संयोजक दत्ता देवकते,ग्रेड मुख्याध्यापक संघटनेचे तालुकाध्यक्ष मोहन गंगणे, दिव्यांग संघटनेचे इंद्रजीत डांगे,दिनेश जाधवर, उमेश नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले.
Leave a comment