बीड । वार्ताहर
महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण संस्था मुबई संचालित जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय बीड येथे कार्यरत असून या अंतर्गत जिल्ह्यातील एच आई. व्ही बाधित रुणांना नियमितऔषधोपचार देण्यासाठी जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालय बीड व स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबेजोगाई येथे ए आर टी सेन्टर कार्यरत आहेत.
एचआयव्हीसह जीवन जगणार्या व्यक्तींना नियमित एआरटी औषधे घ्यावी लागतात. सध्या लॉकडाउनमुळे औषधोपचार घेण्यामध्ये अडचणी येऊ नयेत म्हणून तालुका स्तरावर लिंक एआरटी सेंटर(आष्टी, गेवराई, माजलगाव, कैज,धारूर) तसेच विविध आयसीटीसी सेंटरच्या माध्यमातून औषधाचे वितरण करण्यात येत आहे. एआरटी सेंटरपर्यंत रुग्णांना येत असताना रस्त्यामध्ये लॉक डाउन काळात अडथळे निर्माण होऊ नयेत म्हणून पोलीस अधीक्षक व प्रशासनाला करण्यात आली आहे. जिल्हा एड्स नियंत्रण कक्षातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा आय. सीटीसी पर्यवेक्षक व सर्व डापकु टीम यांचे माध्यमातून समन्वय व सनियंत्रण या बाबतीत केले जात आहे तर प्रत्यक्ष औषधोपचार वितरनामध्ये,दोन्ही एआरटी सेंटरचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, व सर्व एआरटी व आयसीटीसी स्टाफ यांची महत्वाची जबाबदारी आहे.गोरगरिब व गरजू रुग्णांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांना आवश्यक औषधी घरपोच पोहचते करण्यामध्ये विहान कर्मचारी वर्ग यांचे पण सहकार्य लाभत आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली आहे.
Leave a comment