जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज
बीड । वार्ताहर
सध्या देशभर कोरोनामुळे लॉकडावून आहे. या लॉकडाऊनमध्ये बीड जिल्ह्यातील एकूण 56 विद्यार्थी कोठा येथे अडकले आहेत. लॉकडाऊन वाढल्याने हे विद्यार्थी तेथेच अडकून पडले आहेत. त्यांना परत बीड जिल्ह्यात आणण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसाठी याकडे लक्ष घालून सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडावे अशी मागणी पालकांमधून होवू लागली आहे.
डॉक्टर, इंजिनियर, आयटी वन्य उच्च शिक्षणासाठी बीड जिल्ह्यातील मुले आहेत राजस्थान राज्यातील कोटा हे शिक्षणासाठी नामांकित आहे. देशभरातून जवळपास पंचेचाळीस ते पन्नास हजार मुले कोटा येथे असतात. त्यापैकी उत्तर प्रदेश सरकारने स्वखर्चाने बस पाठवून बावीस हजार मुले मायदेशी परत नेले. झारखंड सरकारनेही मुले परत नेली. मध्यप्रदेश सरकारनेही जवळपास आठ हजार मुले परत नेली आहेत. महाराष्ट्रातील एकूण दोन हजार ते दोन ते अडीच हजार विद्यार्थी तिथे अडकलेली आहेत परंतु राज्य सरकारच्या परवानगीशिवाय ते तेथून इकडे येऊ शकत नाहीत सरकार नियुक्त स्वखर्चाने बस पाठवून बोलवावे किंवा सरकार खर्च करणार नसेल तर त्यांना येण्याची अधिकृत परवानगी द्यावी याबाबतीत जिल्ह्याचे पालकमंत्री मुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे असे पालक वर्गाकडून वारंवार विनंती होत आहे. बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी पालकांनी केली आहे.
Leave a comment