धारुर । वार्ताहर
व्यावसायिक स्पर्धेतून एका तरुणावर हल्ला केल्याची घटना धारुर येथे घडली. यावरुन गुरुवारी पाच जणांवर गुन्हा नोंद झाला.
बालासाहेब अनंतराव सिरसट (30, रा. उदयनगर, धारुर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. धारुर- तांदळवाडी रस्त्यावर त्यांनी बोअर घेऊन नव्याने पाण्याचा प्लँट सुरु केला. 21 रोजी ’तू आमच्या बोअरजवळ नवीन ओबर का घेतला, त्यामुळे आमच्या बोअरचे पाणी कमी झाले तसेच, पाण्याचा प्लँट का सुरु केला?’ अशी कुरापत काढून त्याच्यावर काठी, गजाने हल्ला केला, जीवे मारण्याची धमकी दिली.बालासाहेब सिरसटच्या फिर्यादीवरुन गणेश फावडे, बबलू उर्फ सुनील फावडे, बळीराम जेधे, प्रभाकरफावडे, कृष्णा साखरे यांच्यावर धारुर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला. सहाय्यक फौजदार बास्टे अधिक तपास करत आहेत.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment