जगभरात करोना विषाणू संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. इटलीनंतर आता अमेरिकेत करोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. पृथ्वीच्या पटलावर एकही देश नाही, जेथे करोना बाधित नाहीत. जागतिक स्तरावर लाखों करोना बाधित रुग्ण असून, मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या हजारोंच्या घरात गेली आहे. भारतातही करोना बाधितांची दोन हजारांवर पोहोचली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक करोना बाधित आहेत. २२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू व टाळी आणि थाळी नादाचे आवाहन केले होते. देशवासीयांनी या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला होता. यानंतर करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. देशवासी आपापल्यापरिने याला प्रतिसाद देत आहेत. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी रेल्वेसेवाही बंद करण्यात आली आहे. करोनाचे संकट गहिरे होत असताना त्यातून सकारात्मकता मिळावी, यासाठी पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा देशवासीयांना साद घातली आहे. नेमके काय आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे आणि दीप प्रज्ज्वलनाचे महत्त्व काय? जाणून घेऊया...
​पंतप्रधान मोदींचे आवाहन

करोना वॉरियर्सना मदत व्हावी, यासाठी सर्वांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. करोना संकटाचे काळे ढग गडद होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशवासीयांना आवाहन केले आहे. रविवार, ५ एप्रिल २०२० रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील सर्व लाइट्स बंद करावे. घराच्या प्रवेशद्वाराजवळ वा बालकनीमध्ये दीप प्रज्ज्वलन करावे. मेणबत्ती, पणती/दिवा, टॉर्च, मोबाइलचा फ्लॅश यापैकी कोणत्याही गोष्टीचा वापर करून दीपोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
'हे' आहेत एप्रिल महिन्यातील मुख्य सण-उत्सव
मराठी नववर्षः 'या' राशींना ठरणार यंदाचे वर्ष लाभदायक
​दिव्याचे महत्त्व

करोनाच्या तिमिरातून करोनामुक्त भारताच्या तेजाकडे जाण्याचा हा एक प्रयत्न देशभरात केला जाणार आहे. हिंदू संस्कृती आणि परंपरेत दीप प्रज्ज्वलन हा खूप मोठा आणि महत्त्वाचा संस्कार आहे. दिवा हे तेजाचे, ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतिक मानले जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे दिव्याला सकारात्मकतेचे प्रतिक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानण्यात आले आहे. घरात दीप प्रज्वलन करणे शुभ मानले जाते. घरातील दिवे सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात.
कलियुगाची किती वर्षे सरली? विष्णुपुराण सांगते...
सामर्थ्याची साधना, साधनेचे सामर्थ्य सांगणारे समर्थ
​सकारात्मकतेचे आवाहन

दीपज्योति: परब्रह्म: दीपज्योति: जनार्दन:। दीपोहरतिमे पापं संध्यादीपं नामोस्तुते।।
शुभं करोतु कल्याणमारोग्यं सुखं सम्पदां। शत्रुवृद्धि विनाशाय दीपज्योति: नमोस्तुति।।
दिव्याचा प्रकाश परब्रह्म व नारायण स्वरुप मानला गेला आहे. तिन्हीसांजेला प्रज्ज्वलित केलेला दिवा केवळ अंधकार आणि नकारात्मक ऊर्जा संपुष्टात आणत नाही, तर घरात आणि मनात चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जेचा भरणा करतो. दीप प्रज्ज्वलन हे धर्म आणि विजयाचे सूचक मानले आहे. धर्म ग्रंथांमध्ये अंधकाराला असुरी शक्तींचे साथीदार मानण्यात आले आहे. छोटीशी पणती या अंधकाराला परास्त करण्याची क्षमता ठेवते आणि मनात आशेचा सकारात्मक किरण निर्माण करते. करोनाच्या अंधकारात सकारात्मकतेचे आवाहन करण्यासाठी दीप प्रज्ज्वलन करण्यास सांगितले आहे.
शिवपुण्यदिन: शिवरायांची 'ही' अष्टसुत्री प्रेरणादायी
शिवतेजः छत्रपती शिवरायांचा सर्जिकल स्ट्राइक
​रात्री दीप प्रज्ज्वल करण्यामागील कारण

पुराणांनुसार, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सूर्याची किरणे पृथ्वीवर संचार करत असतात. सूर्याच्या उष्णतेमुळे बारीक जीवजंतू, विषाणू, रोगजंतू मारले जातात. मात्र, सूर्यास्तानंतर सूर्य किरणे पृथ्वीवर नसतात. वातावरणातील उष्णता काही प्रमाणात कायम राहावी, यासाठी तिन्हीसांजेला दिवे लावण्याची परंपरा प्राचीन काळापासून आपल्याकडे सुरू आहे. प्राचीन काळात ऋषि-मुनी आणि सामान्य नागरिकही सायंकाळी एका ठराविक वेळी दीप प्रज्ज्वलन करीत असत. आजच्या काळातही कोट्यवधी घरात दिवेलागणीवेळी देवासमोर, तुळशीसमोर आणि घरातील प्रवेशद्वाराजवळ दिवा लावला जातो. काही घरांमध्ये कापूर, जटामांसी, लोबान यांचे मिश्रण करून धूपही घातला जातो. धूपामुळे घरातील विषाणू नष्ट होतात आणि घरात सकारात्मकता येते. घरातील प्रत्येक खोलीत धूप फिरवल्याने संपूर्ण घर शुद्ध होण्यास मदत होते.
करोनाः भारतीय संस्कृतीची जगाकडून दखल, कृती
लॉकडाऊनः घरी बसून कंटाळा आलाय? 'हे' करा
​अमृतासमान दिव्याला महत्त्व

ऋग्वेदात दिव्याला अमृतासमान महत्त्व देण्यात आले आहे. देवरुप प्रकाशातून अंधकाराचा नाश करण्याची प्रेरणा आम्हाला मिळो, जीवन सुखी होवो, असे आवाहन अग्नी देवतेला करण्यात येते. तर, दुसरीकडे कार्तिक कृष्ण त्रयोदशीला घरात, घराच्या छतावर, प्रवेशद्वाराजवळ दीप प्रज्ज्वलन करण्याची परंपरा आहे. त्यामुळे यमराज प्रसन्न होतात आणि मृत्यूचे भय राहत नाही, अशी मान्यता आहे. दररोज घरात दिवा लावणे शुभ फलदायी असते, असे सांगितले जाते. त्यामुळे ५ एप्रिल रोजीच्या दीपोत्सवाला उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन सकारात्मकतेचा दिवा प्रत्येक घरी लागेल, असा संकल्प करूया.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.