बँकासह शासनाने मदत करण्याची मागणी 

वडवणी । वार्ताहर

 सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. याचा फटका जिल्ह्यातील पिग्मी एजंटाना बसला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात 3 मे पर्यंत देशात संचारबंदी लागू केलेली आहे.यामुळे जिल्ह्यातील हजारो पिग्मी एजंटवर उपासमारीची वेळ आली आहे. दैनंदिन पिग्मी कलेक्शनला ब्रेक लागला आहे. परिणामी त्यांचा समोर मोठे आर्थिक संकट उभे आहे. 

संचारबंदी,लॉकडाऊन यामुळे छोटे छोटे व्यवसाय पुर्णत:बंद आहेत. अत्यावश्यक सेवा केवळ सुरू आहेत. यामध्ये बँका, पतसंस्था, सोसायटींचा समावेश आहे. असे असेल तरी, पिग्मी एजंटाना मात्र संचारबंदीमुळे दैनंदिन पिग्मी वसुल करता येत नाही. दि.21 मार्चपासून कलेक्शन बंद आहे. 3 मे पर्यंत संचारबंदी, लॉकडाऊन आहे पूढे कधी कधी चालू होईल हे ही सांगता येत नाही. पिग्मी एजंट हा ग्राहक आणि बँक यामधील दुवा आहे. कर्ज वसुली त्यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात होते. तसेच रोख रक्कम मिळवून देणारा बँकांचा महत्वाचा घटक आहे. कोरोना विषाणू मुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट आले आहे.बँकासह शासनाने त्यांना अडचणीत मदत करावी अशी मागणी होत आहे.दरम्यान याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार, सामाजिक न्याय मंत्री याना ईमेलद्वारे निवेदन देण्यात येणार आहे.पिग्मी एजंटाना दोन ते तीन टक्के कमिशन मिळते  संचारबंदी, लॉकडाऊनमुळे कलेक्शन पुर्णपणे बंद आहे.याचा पगारावर परिणाम होणार आहे.त्यामुळे पिग्मी एजंटाना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बँकासह शासनाने याकडे लक्ष देऊन आर्थिक अडचणीत असलेल्या पिग्मी एजंटाना मदत करून न्याय द्यावा अशी मागणी पिग्मी एजंट महेश सदरे यांनी केली आहे. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.