बीड । वार्ताहर
लॉकडाऊनच्या काळातही हातभट्टी जोरात सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपनिरीक्षक नरके व त्यांच्या सहकार्यांनी तेलगाव (खुर्द) येथे छापा मारत 2 हजार 55 लिटर हातभट्टीचे रसायन जप्त केले. केजजवळही पो.नि.त्रिभुवन व त्यांच्या सहकार्यांनी दोन ठिकाणी हातभट्टी,दारूअड्ड्यांवर कारवाई केली.
माजलगाव तालुक्यातील तेलगाव (खुर्द) येथे उपनिरीक्षक नरके, पो.ना.देशमुख, मोरे, खराडे यांनी छापा टाकुन हातभट्टी अड्डा उध्वस्त केला. यावेळी पोलिसांनी 62 हजार 750 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. 2 हजार 55 लिटर रसायन नष्ट करण्यात आले. यावेळी दोन आरोपींना अटक करण्यात आली असुन त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज तालुक्यातील सांगवी शिवारातील पिंपळगाव येथील एका वस्तीवर छापा टाकुन पोलिसांनी 200 लिटर दारू बनविण्याचे रसायन नष्ट केले. जवळच असलेल्या आणखी एका वस्तीवर 10 लिटर हातभट्टी दारू आढळुन आली. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. सदरील कारवाई पोलिस निरीक्षक प्रदिप त्रिभुवन व त्यांच्या सहकार्यांनी केली.
Leave a comment