बीडला आठ तर अंबाजोगाईत दोन
बीड । वार्ताहर
आष्टी तालुक्यातील लागण झालेल्या एका रुग्णाचे 14 दिवसानंतरचे दोन्ही अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्याने गुरुवारी (दि.23) बीड जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे.असे असले तरी आज शुक्रवारी (दि.24) सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशनमधून 8 तर अंबाजोगाईच्या स्वारातीच्या आयसोलेशनमधून 2 अशा एकुण 10 जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीला घेवून प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
आज सायंकाळपर्यंत हे सर्व रिपोर्ट प्राप्त होतील अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली. गुरुवारी कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला होता, मात्र आज शुक्रवारी सकाळी पुन्हा दहा जण आयसोलेशनमध्ये दाखल झाल्याने काळजी वाढली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून 180 जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासले गेले आहेत. त्यातील 170 अहवाल कोरोना निगेटिव्ह आलेले आहेत. आता आजच्या 10 अहवालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
(संग्रहीत फोटो)
Leave a comment