वडवणी । सुधाकर पोटभरे
देशासह राज्यात कोरोना महामारी मुळे देशात लॉक डाऊन केल्यामुळे याचा सर्वात जास्त फटका हा शेतकरी वर्गाला बसत आहे यावर्षी कापसाची खरेदी ही शासनामार्फत केली होती मात्र तालुक्यातील काही शेतकर्यांनी कापूस जिनिंगवर घातला परंतु अजून ही तब्बल 2500 शेतकर्यांनी अधिकृत कृषी उत्पन्न बाजार समिती वडवणी येथे ऑनलाइन कापसाच्या नोंदी केले आहेत मात्र लोक डाऊन’मुळे कापूस खरेदी केंद्र बंद पडले होते मात्र शासनाने कापूस खरेदी केंद्र जिल्ह्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला काही ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यात आली मात्र वडवणी तालुक्यात अद्यापही एकही खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नसल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे चित्र निर्माण झाले आहे तरी शासनाने ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकर्याचा कापूस खरेदी करण्यासाठी तालुक्यात खरेदी केंद्र सुरू करावीत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
राज्यात शेतकर्याची नगदी पीक म्हणून ओळख असणार्या कापूस या पिकाकडे पाहिले जाते वर्षाच्या सुरुवातीला पाऊस न पडल्यामुळे व दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे त्याचा फटका कापूस उत्पादनावर बसला होता थोड्याफार पाउसावर कसेतरी पिक आले होते तो कापूस वेचुन सध्या घरात पडून आहे यावर्षी निसर्गाने साथ न दिल्यामुळे कापसाला उतार कमी लागला एका बँगला दीड कुंटलच कापूस निघाला असल्यामुळे त्याचा खर्चही निघणे मुश्किल झाले आहे त्यामुळे शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे आता पावसाळा अगदी महिना दीड महिन्यावर येऊन ठेपला आहे शेतीच्या मशागतीचे कामे ही शेतकरी शेतकर्यांना करायची आहेत मात्र ही कामे करण्यासाठी पैशाची अत्यंत गरज आहे मात्र कापूस विकला गेला नसल्यामुळे पैसे आणायचे कुठून हा मोठा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे कोरोना या महामारी पासून वाचवण्यासाठी शासनाने लॉक डाऊन केला आहे हे एक प्रकारे माणसाच्या हीता साठी योग्य निर्णय आहे मात्र शासनाने यातून काही तोडगा काढून शेतकर्यासाठी प्रत्येक तालुक्यात दोन-तीन जिनिंग सुरू करून 2500 शेतकर्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेला कापूस खरेदी करून न्याय द्यावा जेणेकरून शेतकर्याची आर्थिक पिळवणूक होणार नाही तात्काळ तालुक्यात कापूस खरेदी केंद्र सुरु करावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.[प्रतिकात्मक फोटो]
Leave a comment